आधार कार्ड केंद्राअभावी नागरिकांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 11:26 PM2019-04-14T23:26:28+5:302019-04-14T23:26:40+5:30

पनवेल परिसरातील खासगी जागेवर सुरू करण्यात आलेले आधारकार्ड केंद्र बंद झाले आहे.

Disadvantage of citizens due to lack of Aadhar card center | आधार कार्ड केंद्राअभावी नागरिकांची गैरसोय

आधार कार्ड केंद्राअभावी नागरिकांची गैरसोय

Next

कळंबोली : पनवेल परिसरातील खासगी जागेवर सुरू करण्यात आलेले आधारकार्ड केंद्र बंद झाले आहे. त्याऐवजी ही केंदे्र शासकीय कार्यालयात सुरू करण्यात यावीत, असे आदेश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानुसार संबंधित कार्यालयातील प्रमुखाने जागा उपलब्ध करून देण्याबाबत लेखी कळविण्यात आले आहे. मात्र, चार महिने झाले तरी शासकीय कार्यालयांत आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे पनवेलमधील नागरिकांची गैरसोय होत आहे. बँक खाते, मोबाइल नंबर, कर्ज, रेशन कार्ड लिंक करण्याकरिता आधारची मागणी केली जाते. याशिवाय सरल डाटासाठी विद्यार्थ्यांना आधारची आवश्यकता आहे. ओळखपत्र आणि रहिवासाचा पुरावा म्हणूनही हे कार्ड महत्त्वाचे मानले जाते.
आधी ई-सेवा केंद्रात आधार कार्ड काढून दिले जात असे. त्यानंतर पोस्ट कार्यालयात आधार कार्ड नोंदणी सुविधा शासनाकडून करण्यात आली. पनवेल परिसराचा विचार केला तर १९ ठिकाणी आधार कार्ड केंद्र होते. मात्र, खासगी ठिकाणी असलेले हे केंद्र शासकीय कार्यालयात स्थलांतरित करण्यात यावेत, असा आदेश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.
मात्र, गेल्या चार महिन्यांपासून याबाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत. या संदर्भात प्रभाग समितीचे सभापती राजू सोनी यांनी १५
डिसेंबर रोजी जिल्हाधिकाºयांना पत्र लिहून सर्व शासकीय कार्यालयात आधारकेंद्र सुरू करण्याबाबत पुन्हा आदेश काढावा, अशी मागणी
केली आहे. आधार कार्ड नसल्याने गैरसोय होत असल्याची तक्रार मोर्बे येथील ग्रामस्थ गणेश पाटील यांनी केली आहे.
>महापालिकेच्या मुख्यालयातून प्रत्येक प्रभाग अधिकाºयांना आधारकेंद्राला जागा देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार त्या त्या प्रभागात जागा दिल्या जातील. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आले आहे.
- चंद्रशेखर खामकर, सहायक आयुक्त,
आस्थापना विभाग, पनवेल महापालिका
>पनवेल परिसरात आधारकेंद्रांना शासकीय कार्यालयांमध्ये जागा उपलब्ध करून देण्याबाबत तालुका प्रशासन प्रयत्नशील आहे. सध्या लोकसभा निवडणुकीत सर्व यंत्रणा व्यस्त आहे. त्यानंतर याबाबतची माहिती घेऊन त्वरित कार्यवाही करण्यात येईल.
- अमित सानप, तहसीलदार, पनवेल तालुका

Web Title: Disadvantage of citizens due to lack of Aadhar card center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.