मौजे कोन सोडतीतील ३९५ यशस्वी गिरणी कामगार / वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 05:54 PM2017-12-15T17:54:27+5:302017-12-15T17:54:54+5:30

महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (MMRDA) रेंटल हौसिंग स्कीमद्वारे मौजे कोन, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथील प्राप्त २४१७ सदनिकांची मुंबई गृहनिर्माण

Deadline for submitting documents to 395 successful mill workers / heirs in wagons cone drops | मौजे कोन सोडतीतील ३९५ यशस्वी गिरणी कामगार / वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ 

मौजे कोन सोडतीतील ३९५ यशस्वी गिरणी कामगार / वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ 

googlenewsNext

मुंबई :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (MMRDA) रेंटल हौसिंग स्कीमद्वारे मौजे कोन, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथील प्राप्त २४१७ सदनिकांची मुंबई गृहनिर्माण व  क्षेत्रविकास मंडळातर्फे डिसेंबर २०१६ मधील संगणकीय सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या ३९५ गिरणी कामगार / वारसांना पात्रता सिद्ध करण्याकरिता विहित कागदपत्रे कोटक महिंद्रा बँकेत सादर करण्यासाठी दिनांक १८/१२/२०१७ पासून दिनांक १७/०१/२०१८ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय मुंबई मंडळातर्फे घेण्यात येत आहे. 

     "एमएमआरडीए "च्या अखत्यारीतील रायगड जिल्ह्यातील मौजे कोन, तालुका पनवेल येथील सदनिकांच्या सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार / वारसांना पात्रता सिद्ध करण्याकरिता कागदपत्रे सादर करण्यासाठी यापूर्वी दिनांक २२/०९/२०१७ पर्यंत व त्यानंतर दिनांक ०९/११/२०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, अद्यापपर्यंत कागदपत्रे प्राप्त न झाल्याने मुंबई मंडळातर्फे यशस्वी अर्जदारांना वारंवार कागदपत्रांच्या सादरीकरणाकरिता आवाहन करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) अधिकृत संकेतस्थळ https://mhada.maharashtra.gov.in वर सोडतीतील ३९५ यशस्वी गिरणी कामगार / वारसांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यांना उपमुख्य अधिकारी, मुंबई मंडळ कार्यालयामार्फत त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर "प्रथम सूचना पत्रे" पाठविण्यात आली आहेत. परंतु, चुकीचे पत्ते यासारख्या विविध कारणांमुळे एकूण १४९ गिरणी कामगारांची "प्रथम सूचना पत्रे"  कार्यालयात परत आलेली आहेत. अशा गिरणी कामगार / वारसांची यादीही "म्हाडा"च्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

     मुंबई मंडळातर्फे २ डिसेंबर २०१६ रोजीच्या गिरणी कामगारांच्या सोडतीमधील यशस्वी अर्जदारांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्या गिरणी कामगार / वारस यांना प्रथम सूचना पत्रे मिळाली नाहीत, त्यांनी म्हाडा कार्यालयात कक्ष क्र. २०५, पहिला मजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१ येथे योग्य त्या पुराव्यासह व्यक्तिशः उपस्थित राहून व ओळख पटवून प्रथम सूचना पात्र प्राप्त करून घ्यावे व विहित मुदतीत कागदपत्रे सादर करावीत. यासंबंधी  गिरणी कामगार / वारस यांना कोणतीही शंका / अडचण असल्यास हेल्पलाईन क्रमांक ९८६९९८८००० व ०२२-६६४०५०४१ वर संपर्क साधावा. वरील मुदतीत गिरणी कामगार / वारस यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या हॉलमार्क प्लाझा, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ५१ या शाखेत बँकेच्या कार्यालयीन दिवशी व वेळेत कागदपत्रे सादर करावीत. विहित मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास सोडतीतील यशस्वी अर्जदाराचा अर्ज रद्द ठरवून प्रतीक्षा यादीवरील गिरणी कामगार / वारस यांना संधी देण्यात येईल. याबाबत मुंबई गृहनिर्माण व  क्षेत्रविकास मंडळ जबाबदार राहणार नाही. तसेच मुंबई मंडळ / म्हाडा / एमएमआरडीए यांनी सदनिकांच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी , कोणालाही प्रतिनिधी / सल्लागार / एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीशी / मध्यस्थांशी कोणताही परस्पर व्यवहार केल्यास मुंबई मंडळ / म्हाडा / एमएमआरडीए जबाबदार राहणार नाही, कृपया याची सर्व संबधीत गिरणी कामगार / वारस यांनी नोंद घ्यावी.         

Web Title: Deadline for submitting documents to 395 successful mill workers / heirs in wagons cone drops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.