कर्नाळा अभयारण्यातील वन्यप्राण्यांची गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:01 AM2019-05-19T00:01:35+5:302019-05-19T00:01:37+5:30

संडे अँकर । दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला मोहीम; वन्यजीव विभागामार्फत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित

Calculation of Wildlife in Karnala Wildlife Sanctuary | कर्नाळा अभयारण्यातील वन्यप्राण्यांची गणना

कर्नाळा अभयारण्यातील वन्यप्राण्यांची गणना

Next

- वैभव गायकर।

पनवेल : कर्नाळा अभयारण्यातील पक्षी, प्राण्यांची गणना करण्यासाठी वन्यजीव विभागामार्फत शनिवारी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अभयारण्यातील विविध भागात ट्रॅक कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वन्यजीव विभागामार्फत पक्षी-प्राण्यांची गणना करण्यासाठी हा उपक्र म राबवला जातो.


नवी मुंबई, पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात सिमेंटचे जंगल उभे राहत आहे, त्यामुळे पनवेलपासून अवघ्या काही कि.मी. अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. मागील वर्षी सुमारे ८८ हजार पर्यटकांनी या अभयारण्याला भेट दिली होती. सुमारे १२.१५५ चौरस किलोमीटरच्या परिसरात हे अभयारण्य वसले आहे. स्थानिक तसेच स्थलांतरित १४७ प्रजातीचे पक्षी या ठिकाणी आहेत. यामध्ये ३७ प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित पक्षी आहेत. विविध प्रकारच्या हिंस्र प्राण्यांचाही या ठिकाणी अधिवास आहे. या प्राण्यांच्या सध्याची स्थिती माहिती करण्यासाठी वन्यजीव विभागामार्फत चार ठिकाणी ट्रॅक कॅमेरे लावण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हे कॅमेरे कार्यरत राहणार आहेत. सध्याची वातावरणातील परिस्थिती तसेच वाढता उकाडा पाहता, पाणथळ्या शेजारी हे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या ट्रॅक कॅमेऱ्यामध्ये एक चीप बसविण्यात आल्याने प्राण्यांची हालचाल झाल्यास त्यांचे छायाचित्रच या कॅमेºयात कैद होणार आहेत. प्राण्याच्या पायांचे ठसेही हा कॅमेरा टिपणार आहे.


२४ तास कार्यान्वित असणाºया या कॅमेऱ्यांच्या निगराणीची जबाबदारी एक वनरक्षक व दोन वनमजुरांवर देण्यात आली आहे. कॅमेºयातील चीपमध्ये कैद झालेल्या छायाचित्राच्या आधारे नव्याने प्राणी व पक्ष्यांची गणना केली जाणार आहे. या कॅमेºयात कैद झालेल्या माहितीच्या आधारे लवकरच अभयारण्यात कोणकोणत्या पक्ष्यांचा व प्राण्याचा वावर आहे, याची सविस्तर माहिती या मोहिमेद्वारे समोर येणार आहे.

या प्राण्यांचा समावेश
कर्नाळा उभारण्यात बिबटे, बेकर, रानडुक्कर, साळींदर, रानमांजर, ससा आदी दुर्मीळ प्राणी या ठिकाणी आढळतात, तर पक्ष्यांमध्ये मध्य आशिया, युरोप, उजबेकिस्तान, सैबेरियामधून पक्षी या ठिकाणी स्थलांतरित होत असतात. यामध्ये मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फ्लाय कॅचर, भोरड्या, तांबट, कोतवाल, पांढºया पाठीची गिधाडे, दयाळ, शाहीन ससाणा, टिटवी व विविध प्रजातीचा समावेश आहे.

या ठिकाणी लावले आहेत ट्रॅक कॅमेरे
कर्नाळा अभयारण्य माहिती केंद्राच्या मागील बाजूस, अभयारण्यातील मयूर तलाव, कमळ तलाव व घेरावाडी आदिवासी वाडीनजीक हे कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा राबता असल्याने ही ठिकाणे प्राण्यांची गणना करण्यासाठी निवडली असल्याची माहिती कर्नाळा अभयारण्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांनी दिली.

बौद्ध पौर्णिमेला वन्यजीव गणना का?
वैशाख शुक्ल पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा ही उन्हाळ्याच्या दिवसातील सर्वाधिक प्रकाशमय रात्र असते. वैशाख महिन्यात उन्हाच्या झळा तीव्र असतात, यामुळे पाणथळ्यावर हमखास प्राणी येत असतात २४ तासांमध्ये त्यांची गणना केली जाते. रात्री किमान एकदा तरी प्राणी पाणथळ्यावर येतोच. वनविभागाचे अधिकारी याकडे बारकाईने लक्ष ठेवून असतात.

Web Title: Calculation of Wildlife in Karnala Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.