बाजार समितीमध्ये बाजरीची तिप्पट आवक; घरासह हॉटेलमध्येही बाजरीच्या वस्तूंना मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:00 AM2019-01-05T00:00:05+5:302019-01-05T00:00:16+5:30

हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईमधील धान्य मार्केटमध्ये बाजरीची आवक तिप्पट झाली आहे. एक महिन्यापूर्वी रोज २० ते ३० टन आवक होत होती, ती ८० ते १०० टन एवढी झाली आहे.

 Bribe triple in market committee; The demand for millet products in the hotel along with the house grew | बाजार समितीमध्ये बाजरीची तिप्पट आवक; घरासह हॉटेलमध्येही बाजरीच्या वस्तूंना मागणी वाढली

बाजार समितीमध्ये बाजरीची तिप्पट आवक; घरासह हॉटेलमध्येही बाजरीच्या वस्तूंना मागणी वाढली

googlenewsNext

- नामदेव मोरे

नवी मुंबई : हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईमधील धान्य मार्केटमध्ये बाजरीची आवक तिप्पट झाली आहे. एक महिन्यापूर्वी रोज २० ते ३० टन आवक होत होती, ती ८० ते १०० टन एवढी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांसह गुजरात व उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात आवक होत असून, १८ ते २६ रुपये किलो दराने विक्री होत आहे.
मुंबई, नवी मुंबईकरांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढू लागली असून प्रत्येक मोसमामध्ये आहारात बदल होऊ लागले आहेत. थंडी सुरू झाल्यापासून उष्णतावर्धक वस्तूंची मागणी वाढली आहे. यामध्ये सर्वांत जास्त मागणी बाजरीला आहे. बलवर्धक धान्य म्हणून याची ओळख आहे. कफनाशक, उष्णतावर्धक बाजरीमध्ये तंतुमय पदार्थ, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक व व्हिटॅमिन ई आढळून येते. यामुळेच प्रत्येक वर्षी हिवाळ्यामध्ये ग्राहकांकडून याला पसंती मिळत असते. एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये १७०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत होती. थंडी सुरू झाल्यापासून आवक तिप्पट झाली असून, बाजारभावही क्विंटलला १०० रुपयांनी वाढले आहेत.
सद्य:स्थितीत १८०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर व इतर ठिकाणांवरून बाजरी विक्रीला येत आहे. उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात आवक होत असून, काही प्रमाणात गुजरातवरून आवक होत आहे. हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईकरांच्या घरांमध्ये व हॉटेलमध्येही बाजरीची भाकरी, थालीपीठ, बाजरीची वडी व इतर पदार्थांना पसंती मिळत आहे. मुंबईत चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी व परराज्यातील व्यापारी मुंबईत बाजरी विक्रीसाठी पाठवू लागले आहेत.
बाजरीचे जगातील सर्वाधिक ४२ टक्के उत्पादन भारतामध्ये होत असते. राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाना, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते. राज्यातील नाशिक, जालना व इतर जिल्ह्यांमध्ये बाजरीची लागवड केली जाते.
राज्यात सर्वाधिक विक्री मुंबईत होत आहे. मकरसंक्रांतीपर्यंत आवक चांगली राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुढील कारणांमुळे बाजरीला मागणी
बाजरी उष्णतावर्धक असल्यामुळे हिवाळ्यामध्ये ऊर्जास्रोत ठरत आहे. बाजरीच्या पदार्थांमुळे खूप वेळेपर्यंत भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठीही बाजरीचा उपयोग होतो.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजरीचा उपयोग होतो. यामुळे हृदय सक्षम होण्यास मदत होते. यामध्ये मेग्नॅशियम व पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
बाजरीमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते. नियमित बाजरीचे पदार्थ खाल्ल्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत
होते.
कफनाशक, उष्णतावर्धक बाजरीमध्ये तंतुमय पदार्थ, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक व व्हिटॅमिन ई आढळून येते.

बाजरीचे पदार्थ
थालीपीठ, भाकरी, सूप, कटलेट्स,
बाजरी खिचडी, मेथी वडी, खारवडे

बाजरीची आवक व बाजारभाव
मार्केट आवक (क्विंटल) भाव (किलो)
मुंबई ८०७ १८ ते २६
जालना १०६ १५ ते २२
बारामती २५९ १५ ते २२
उल्हासनगर ११५ २० ते २२

राज्यनिहाय बाजरीचे उत्पादन (२०१६)
राज्य उत्पादन टक्के
राजस्थान ३५३० ४३.६९
उत्तर प्रदेश १७८० २२.३
गुजरात ७९० ९.७८
हरियाना ६५० ८.४
मध्य प्रदेश ५९० ७.३०
महाराष्ट्र ३४० ४.२१

Web Title:  Bribe triple in market committee; The demand for millet products in the hotel along with the house grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.