पनवेलमध्ये राज्यभरातील पहिलवानांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 01:00 AM2017-12-04T01:00:11+5:302017-12-04T01:00:11+5:30

पनवेलमध्ये राज्यस्तरीय ४० व्या खाशाबा जाधव राज्यव्यापी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला शनिवारी सुरु वात झाली. शुक्रवारी या स्पर्धेकरिता राज्यभरातील पहिलवानांचे आगमन

The arrival of the first lady of the state in Panvel | पनवेलमध्ये राज्यभरातील पहिलवानांचे आगमन

पनवेलमध्ये राज्यभरातील पहिलवानांचे आगमन

Next

पनवेल : पनवेलमध्ये राज्यस्तरीय ४० व्या खाशाबा जाधव राज्यव्यापी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला शनिवारी सुरु वात झाली. शुक्रवारी या स्पर्धेकरिता राज्यभरातील पहिलवानांचे आगमन पनवेलमध्ये झाले होते. ज्युनियर आणि सब ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी १५०० पहिलवान असणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर येथील कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीत दाखल झाले होते.
के. व्ही. कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्फूर्ती गीत गायले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण संपन्न झाले. दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन संपन्न झाले. या वेळी मार्गदर्शन करताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, माजी आमदार दत्तू पाटील क्र ीडा नगरीत सगळ्यांचे स्वागत करतो. रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचा पदाधिकारी झाल्यानंतर माझा आणि कुस्तीचा संबंध आला, हे प्रांजळपणे मान्य करतो. विद्यार्थीदशेत मी या खेळाकडे फारसे लक्ष दिले नव्हते. परंतु रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्राच्या मातीतल्या या रांगड्या खेळाला प्राधान्य देण्यासाठी मी खेळाडूंना खावटी, प्रवास भत्ता आणि कीट देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करवून घेतली. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या खेळांचा वाटा आहे त्यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. व्ही. के. हायस्कूल, के.व्ही. कन्या विद्यालयांनी माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयातील शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन खेळाडूंचे भोजन व निवास यांची सोय केली आहे. कुस्ती या खेळाला ऊर्जितावस्था मिळवून देणे आणि उदयोन्मुख खेळाडूंना कुस्तीकडे आकर्षित करणे हे उद्देश डोळ्यापुढे ठेवून आम्ही या स्पर्धांचे आयोजन केले आहे. या वेळी माजी मंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, माजी आमदार विवेक पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पमपा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, मारुती अडकर, नामदेवराव मोहिते, नवी मुंबई महापौर जयवंत सुतार, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील, पमपा विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, नारायण घरत, नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. जयाजी नाथ आदी मान्यवरांसह हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

Web Title: The arrival of the first lady of the state in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.