आकाश नामदेव शेळके या युवकावर हल्ला केल्यानं दोघांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 02:47 AM2017-10-23T02:47:33+5:302017-10-23T02:47:41+5:30

पनवेल तालुक्यातील वावंजे गावातील आकाश नामदेव शेळके या युवकाच्या डोक्यावर लोखंडी पाइपने हल्ला चढवत त्याला दोघांनी जखमी केले असून, तालुका पोलिसांनी यातील एकाला अटक केली आहे

Akash Namdev Shelke attacked the youth and filed an offense under Atrocity | आकाश नामदेव शेळके या युवकावर हल्ला केल्यानं दोघांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

आकाश नामदेव शेळके या युवकावर हल्ला केल्यानं दोघांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

Next

पनवेल : पनवेल तालुक्यातील वावंजे गावातील आकाश नामदेव शेळके या युवकाच्या डोक्यावर लोखंडी पाइपने हल्ला चढवत त्याला दोघांनी जखमी केले असून, तालुका पोलिसांनी यातील एकाला अटक केली आहे, तर दुस-या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही आरोपींवर अ‍ॅट्रोसिटी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वावंजे गावातील आकाश नामदेव शेळके या युवकाला क्षुल्लक कारणावरून रूपेश शेंडे व मेघनाथ पाटील या दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून त्याच्यावर लोखंडी पाइपने डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आकाश नामदेव शेळके हा गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. तालुका पोलीसस्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला असून आरोपी रूपेश शेंडेला अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी मेघनाथ पाटील हा फरार आहे.

Web Title: Akash Namdev Shelke attacked the youth and filed an offense under Atrocity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा