पॅनारोमिक हॉटेलवर बँकेने केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:41 AM2018-03-29T01:41:54+5:302018-03-29T01:41:54+5:30

मुंबई-गोवा महामार्गावरील पॅनारोमिक हॉटेल अपना सहकारी बँकेने सील केले. ४७ कोटी १९ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी

Action taken by the bank at Panoramic Hotel | पॅनारोमिक हॉटेलवर बँकेने केली कारवाई

पॅनारोमिक हॉटेलवर बँकेने केली कारवाई

Next

नवी मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील पॅनारोमिक हॉटेल अपना सहकारी बँकेने सील केले. ४७ कोटी १९ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईमुळे येथील कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला असून, थकलेला पगार कोण देणार? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
पनवेलजवळ ५४७०० चौरस मीटर क्षेत्रफळावर पॅनारोमिक हॉटेल उभारण्यात आले आहे. अपना सहकारी बँकेने हॉटेल व्यवस्थापनाला ४७ कोटी १९ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी वारंवार नोटीस पाठविली होती; परंतु नोटीस पाठवूनही थकीत रक्कम न दिल्याने बँकेच्या अधिकाºयांनी २८ मार्चला हॉटेल सील केले. सकाळीच बँकेचे विशेष पथक हॉटेलवर गेले; परंतु व्यवस्थापनाकडून रक्कम भरण्यासाठी अवधी मागितल्यामुळे दुपारपर्यंत सील करण्याची कारवाई थांबविली होती. पैसे न भरल्यामुळे अखेर कारवाई करण्यात आली. सर्व कर्मचाºयांना हॉटेल सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. या ठिकाणी १२५ पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. जानेवारीपासून त्यांना वेतन मिळालेले नाही. अनेक कर्मचारी उत्तर प्रदेश व पनवेलच्या बाहेरील आहेत.

Web Title: Action taken by the bank at Panoramic Hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.