पनवेल पालिकेचा अर्थसंकल्प ५७३ कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:08 AM2018-03-29T01:08:39+5:302018-03-29T01:08:39+5:30

महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता.

573 crores budget for Panvel Municipal | पनवेल पालिकेचा अर्थसंकल्प ५७३ कोटींचा

पनवेल पालिकेचा अर्थसंकल्प ५७३ कोटींचा

googlenewsNext

पनवेल : महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता. वादळी चर्चेनंतर स्थायी समितीने मंजुरी दिलेला अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेने वाढीव तरतुदीसह ५७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे.
पालिकेत समाविष्ट २९ गावांसाठी २३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शुल्क, स्वच्छ भारत अभियान, वस्तू व सेवा कर अनुदान, अग्निशमन आकार, रस्ता दुरुस्ती, सर्वांसाठी घरे, अमृत योजनेअंतर्गत अनुदान, सर्वसाधारण पाण्यावरील कर, जलनि:सारण कर या आयुक्तांच्या तरतुदीत सुधारणा करून रकमेत वाढ आणि घट केली. महापालिका क्षेत्रात रस्त्यावर नवीन खांब उभारणे, भूमिगत, सर्व्हिस लाइन, साहित्य व खरेदीसाठी आयुक्तांनी केवळ पाच कोटींची तरतूद केली होती, स्थायी समितीने यामध्ये तब्बल २५ कोटी रुपयांची वाढ केली. रस्त्यावर नवीन एलईडी पथदिवे बसविण्यासाठी आयुक्तांनी पाच कोटींची तरतूद केली होती. मात्र, केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत एलईडी दिवे लागणार असल्यामुळे तीन कोटी कमी केले.

अर्थसंकल्पावर सदस्यांनी व्यक्त केली मते
अर्थसंकल्पावर सभागृहनेते, परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील, विक्रांत आदींनी आपले मत मांडले. शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी आपले अभ्यासपूर्ण मत मांडले. झाडे लावण्यासाठी या अर्थसंकल्पात २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, झाडे तोडण्यातही ५० लाखांची तरतूद. या संदर्भातदेखील त्यांनी अर्थसंकल्पावर टीका केली. विशेष म्हणजे, मुंबई, नाशिक धर्तीवर तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कासाडी नदीच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव अर्थसंकल्पात सामील करण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली.

Web Title: 573 crores budget for Panvel Municipal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.