सिडकोच्या शिल्लक घरांसाठी ३५ हजार अर्ज, ३१ जानेवारीपर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 11:23 PM2019-01-21T23:23:29+5:302019-01-21T23:23:43+5:30

ऑगस्ट २0१८ मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीत शिल्लक राहिलेल्या ११00 घरांसाठी सिडकोने १ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत.

35,000 applications for CIDCO remaining homes, till 31 January | सिडकोच्या शिल्लक घरांसाठी ३५ हजार अर्ज, ३१ जानेवारीपर्यंत मुदत

सिडकोच्या शिल्लक घरांसाठी ३५ हजार अर्ज, ३१ जानेवारीपर्यंत मुदत

Next

नवी मुंबई : सिडकोच्या शिल्लक घरांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑगस्ट २0१८ मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीत शिल्लक राहिलेल्या ११00 घरांसाठी सिडकोने १ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. पहिल्या टप्प्यात संधी हुकलेल्या ग्राहकांनी यावेळी पुन्हा नशीब आजमाविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या वीस दिवसांत तब्बल ३५ हजार अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी १७,७१७ ग्राहकांनी अनामत रकमेचा भरणाही केला आहे. उर्वरित दहा दिवसांत अर्जाचा हा आकडा ५0 हजारांचा पल्ला गाठेल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.
आॅगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी १४,८३८ घरांच्या गृहयोजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. या योजनेला राज्यभरातील ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १४,८३८ घरांसाठी सुमारे दोन लाख अर्ज दाखल झाले होते. यातील पात्र दर्जदारांची आॅक्टोबर महिन्यात संगणकीय सोडत काढण्यात आली. यात यशस्वी झालेल्या अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी व इतर प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. असे असले तरी १४,८३४ पैकी तब्बल ११00 घरे विक्रीविना पडून आहेत. यातील बहुतांशी घरे तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये आहेत. त्यामुळे या शिल्लक घरांची सुध्दा विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला. त्यानुसार १ जानेवारीपासून सिडकोच्या मुंबईतील निर्मल कार्यालयात अकराशे घरांसाठी आॅनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली.
पहिल्या सोडतीत संधी हुकलेल्यांना ही सुवर्णसंधी असल्याने मागील वीस दिवसांपासून ग्राहकांनी ३४ हजार ७९२ अर्ज भरले आहेत. यापैकी १७,७१७ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणाही केला आहे. दरम्यान, अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारीपर्यंत असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिल्लक घरांसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची लगेच १४ फेब्रुवारी रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.

Web Title: 35,000 applications for CIDCO remaining homes, till 31 January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.