तरुणांचं ब्रेनवॉश करणा-या मदरसा आणि मशिदींवर योगींची नजर

By admin | Published: April 22, 2017 11:54 AM2017-04-22T11:54:19+5:302017-04-22T11:54:19+5:30

बिजनौरमधील किमान 2000 मशीद आणि मदरसा सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

Yogi's eyes on the madrassa and mosquito breeding youngsters | तरुणांचं ब्रेनवॉश करणा-या मदरसा आणि मशिदींवर योगींची नजर

तरुणांचं ब्रेनवॉश करणा-या मदरसा आणि मशिदींवर योगींची नजर

Next
>ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. 22 - दिल्ली आणि उत्तर प्रदेशला टार्गेट करत दहशतवादी कारवायांमध्ये सामील झालेल्या पाच तरुणांची चौकशी करुन सोडून देण्यात आलं असलं तरी यामुळे पोलीस सतर्क झाले असून मदरसा आणि मशिदींवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक मशिदीचा इमाम मोहम्मद फैजान याला अटक करण्यात आली आहे. बिजनौरमधील किमान 2000 मशीद आणि मदरसा सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतलं होतं त्यापैकी अनेकजण मदरशांमध्ये शिकणारे असून त्यांचं ब्रेनवॉश करण्यात आलं होतं. बिजनौरचे पोलीस अधिक्षक अजय सहानी यांनी सांगितलं आहे की, "पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा बिजनौर आणि आसपासच्या धार्मिक संस्थांवर नजर ठेवून असणार आहे. या संस्थांमध्ये नेहमी जाणा-या जबाबदार नागरिकांचीही आम्ही मदत मागत आहोत, जेणेकरुन तरुणांना भटकण्यापासून रोखता यावं". अल्पसंख्यांक विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण 500 मदरसा आहेत ज्यापैकी 15 डिग्री आणि 55 हायस्कूल दर्जाचे आहेत. एकूण 1500 मशिदी असून सर्वांवर पोलिसांची नजर आहे. 
 
(‘इसिस’चा कट उधळला)
 
गुरुवारी सहा राज्यांच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 19 ते 25 वर्ष वयोगटातील चार तरुणांना अटक केलं होतं, तर आठ तरुणांना ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या तरुणांचा दिल्ली आणि उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ला करण्याचा प्लान होता असा आरोप आहे. सहा तरुणांची नोएडा येथे नेऊन चौकशी करुन सोडून देण्यात आलं. त्यांच्या पालकांना इशाराही देण्यात आला. बिजनौरचे पोलीस अधिक्षक अजय सहानी यांनी सांगितलं की, "चौकशी केल्यानंतर या तरुणांना सोडून देण्यात आलं, तर स्थानिक मशिदीतील इमाम मोहम्मद फैजानला अटक करण्यात आली". 
 
पोलिसांना ताब्यात घेतलेल्या तरुणांचं ब्रेनवॉश करण्यात आलं होतं. हे सर्वजण वेगवेगळ्या मदरशांमध्ये शिकत होते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला. त्यांचं आयुष्य आता वाया जाईल अशी भीती त्यांना वाटत होती. एटीएस अधिका-यांनी सांगितलं की, "त्यांना दहशतवादी सिद्ध करावं असे कोणतेही पुरावे हाती लागले नाहीत. हे फक्त भटकलेले तरुण आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यात सुधारणा करत मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. यामुळे त्यांचा व्यवस्था आणि पोलिसांवरील विश्वास वाढेल. त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षणही दिलं जाईल जेणेकरुन सकारात्मक दिशेने त्यांची वाटचाल सुरु होईल".
 

Web Title: Yogi's eyes on the madrassa and mosquito breeding youngsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.