जागतिक स्त्री-शक्तीचा जागर करण्यासाठी 'ट्रम्प'कन्या येणार भारतात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 11:17 AM2017-09-22T11:17:50+5:302017-09-22T11:18:50+5:30

जगभरातील उद्योजक, नवोन्मेषी कल्पक उद्योजक, गुंतवणुकदार यांना एकत्र आण व्यासपीठ म्हणजेच ग्लोबल आंत्रप्योनरशिप समिट २०१७(जीइएस) हैदराबाद येथे नोव्हेंबर महिन्यात २८ ते ३० अशी तीन दिवस होणार आहे.

World's trumpet will come to India to awaken world power | जागतिक स्त्री-शक्तीचा जागर करण्यासाठी 'ट्रम्प'कन्या येणार भारतात

जागतिक स्त्री-शक्तीचा जागर करण्यासाठी 'ट्रम्प'कन्या येणार भारतात

Next

मुंबई, दि.22- जगभरातील उद्योजक, नवोन्मेषी कल्पक उद्योजक, गुंतवणुकदार यांना एकत्र आण व्यासपीठ म्हणजेच ग्लोबल आंत्रप्योनरशिप समिट २०१७(जीइएस) हैदराबाद येथे नोव्हेंबर महिन्यात २८ ते ३० अशी तीन दिवस होणार आहे. यावर्षी महिला उद्योजक आणि महिला उद्योजकांमध्ये असणारी शक्ती यावर परिषद विचारमंथन करणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या व सल्लागार इवान्का ट्रम्प अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर दोन्ही देश सह-यजमान होऊन परिषद पार पाडतील, असा निर्णय झाला होता. 

नव्या कल्पना मनात असणारे तरुण तसेच नवोन्मेषक अनुभवी उद्योजक यांना एकत्र आणण्याचे काम ही परिषद करत असते. विविध देशातील तरुण या परिषदेत जमतात, आपले अनुभव आणि कल्पना इतरांना सांगतात तसेच जमलेल्या इतर तरुणांच्या कल्पनांवरही चर्चा करतात. अशा प्रकारे एकाचवेळेस जगातील विविध देशांतील तरुणांच्या मनात कोणत्या उद्योजक कल्पना येत आहेत. त्याचं भान सहभागी तरुणांना येत. गुगल, फेसबूक, उबर सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे लोकही यात सहभागी होतात. मागच्या वर्षी सुंदर पिचाई, मार्क झकरबर्ग हे अमेरिकेत झालेल्या परिषदेत सहभागी झाले होते. उपस्थित तरुणांना त्यांनी आपला जीवनप्रवास आणि प्रारंभीच्या काळातील खटपट याबाबत माहिती दिली होती. अशा अनेक कल्पक उद्योजक, गुंतवणुकदारांना या परिषदेत ऐकण्याची संधी तरुणांना मिळते. 

जीइस आणि भारत अमेरिका यांच्या वाढत्या सहसंबंधाबाबत अमेरिकेच्या नवी दिल्ली येथील चार्ज दी अफेअर्स पदावरती असणारे अधिकारी मेरिके कार्लसन म्हणाले, "भारत अमेरिकेच्या नागरिकांचा प्रवास, पर्यटन, व्यापार यामुळे एकमेकांशी अधिक संबंध येऊन दोन्ही देशांतील संबंध दृढ होत आहेत. या डिजिटल युगातील नव्या उद्योगकल्पनांवर जीइएसमध्ये विचार केला जाईल."

भारतातर्फे नीती आयोग भारत सरकारचे प्रतिनिधित्व या परिषदेत करणार आहे. नीती आयोगाचे सीइओ अमिताभ कांत यांनी हैदराबाद येथे ही परिषद होण्यास संमती दिल्याबद्ल तेलंगण सरकारचे आभार मानले होते आणि या परिषदेत समाजाला उपयोगी होईल अशाप्रकारे आरोग्य, पिण्याचे पाणी यांच्या समस्यांवर मंथन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.            

Web Title: World's trumpet will come to India to awaken world power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.