खट्टर म्हणाले, प्रियकराशी बिनसल्यावर मुली बलात्काराची तक्रार करतात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 04:14 AM2018-11-19T04:14:47+5:302018-11-19T04:16:18+5:30

प्रियकराशी बिनसल्यावर मुली बलात्काराची तक्रार करतात. अशी ८० ते ९० टक्के प्रकरणे ओळखीच्या लोकांमधील विसंवादातूनच घडतात, असे वादग्रस्त वक्तव्य हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे.

Women Cry Rape To Get Back At Ex-Boyfriends, Says Haryana Chief Minister | खट्टर म्हणाले, प्रियकराशी बिनसल्यावर मुली बलात्काराची तक्रार करतात

खट्टर म्हणाले, प्रियकराशी बिनसल्यावर मुली बलात्काराची तक्रार करतात

Next

चंदीगड : प्रियकराशी बिनसल्यावर मुली बलात्काराची तक्रार करतात. अशी ८० ते ९० टक्के प्रकरणे ओळखीच्या लोकांमधील विसंवादातूनच घडतात, असे वादग्रस्त वक्तव्य हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. त्याचा व्हिडिओ शनिवारी झळकल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर रविवारीसुद्धा खट्टर यांनी आपल्या विधानांचे समर्थनच केले.
खट्टर म्हणाले, प्रियकर व प्रेयसी बराच काळ एकत्र फिरतात. मात्र, जेव्हा खटके उडू लागतात, एकमेकांशी पटेनासे होते त्यावेळी चित्र वेगळे असते. प्रियकराने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार प्रेयसी पोलिसांकडे दाखल करते.
ते म्हणाले की, सहमतीतून बलात्काराची प्रकरणे असे मी कुठेही म्हटलेले नाही. बलात्काराच्या सर्वाधिक तक्रारी ओळखीच्या लोकांकडूनच केल्या जातात. हे माझे मत नाही, तर पोलिसांनीच तसा अहवाल दिला आहे. या समस्येकडे सामाजिक अंगाने पाहावयास हवे. हरियाणातील गुरगाव, फरिदाबाद येथे २०१६ मध्ये बलात्काराच्या १,१८७ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या, असे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीत म्हटले आहे. त्यात बलात्काराची ९९६ व सामूहिक बलात्काराची १९१ प्रकरणे आहेत. २०१४ मध्ये महिला अत्याचाराची ९,०१०, २०१५ मध्ये ९,५११, २०१६ मध्ये ९,८३९ प्रकरणे नोंदविण्यात आली.

काँग्रेस व केजरीवाल यांनी केला तीव्र निषेध
खट्टर यांनी केलेले वक्तव्य महिलांविरोधी असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केली. टष्ट्वीटवर त्यांनी म्हटले की, खट्टर यांनी केलेला दावा निंदनीय आहे. या वक्तव्याचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करीत आहे. खट्टर हे बलात्कार प्रकरणांचे समर्थन करीत असल्याचा प्रहार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. ते म्हणाले, एखाद्या मुख्यमंत्र्याचीच अशी मानसिकता असेल, तर तेथील महिला सुरक्षित राहतील, अशी अपेक्षा कशी करता येईल.

Web Title: Women Cry Rape To Get Back At Ex-Boyfriends, Says Haryana Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Haryanaहरयाणा