बलात्कारी पतीची हत्या करणाऱ्या महिलेनं तुरुंगात दिला बाळाला जन्म; कैद्यांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 06:04 PM2020-06-08T18:04:07+5:302020-06-08T18:07:50+5:30

तुरुंगात जन्माला आल्यानं बाळाचं कान्हा असं नामकरण

Woman who killed husband gave birth to a baby in jail | बलात्कारी पतीची हत्या करणाऱ्या महिलेनं तुरुंगात दिला बाळाला जन्म; कैद्यांना अश्रू अनावर

बलात्कारी पतीची हत्या करणाऱ्या महिलेनं तुरुंगात दिला बाळाला जन्म; कैद्यांना अश्रू अनावर

googlenewsNext

जयपूर: पतीची हत्या केल्यानं शिक्षा भोगत असलेल्या महिलेनं तुरुंगात बाळाला जन्म दिला. आई झालेली महिला राजस्थानच्या सीकरमध्ये शिक्षा भोगत आहेत. आपली प्रसुती तुरुंगातच व्हावी, अशी इच्छा महिलेनं व्यक्त केली. शनिवारी रात्री महिलेनं बाळाला जन्म दिल्यानंतर तुरुंगातल्या इतर कैद्यांनी तिचं स्वागत केलं. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. तुरुंगात जन्माला आल्यानं बाळाचं कान्हा असं नामकरण करण्यात आलं.

सीकरच्या शिवसिंहपुरा तुरुंगात असलेल्या महिलेची प्रसुती झाली. २ जूनला या महिलेनं तिच्या पतीची हत्या केली. गरोदर असल्यानं महिलेनं तिच्या बहिणीला घरातील कामात मदत करण्यासाठी बोलावलं होतं. तिच्यावर पतीनं बलात्कार केला. अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करणाऱ्या पतीची गरोदर महिलेनं कुऱ्हाडीनं हत्या केली. त्यानंतर तिनं पतीचा मृतदेह झोपडीजवळ असलेल्या खड्ड्यात पुरला. 

नऊ महिन्यांची गर्भवती असलेली महिला दुसऱ्या दिवशी १२ किलोमीटर चालत पोलीस ठाण्यात पोहोचली. तिनं पोलिसांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेच्या पतीचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला. तो शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली. तिला शिवसिंहपुरा तुरुंगात ठेवण्यात आलं. तुरुंगात असलेली महिला दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिला एक पाच वर्षांची मुलगी आहे. पोलिसांनी महिलेला अटक करण्यापूर्वी तिच्या मुलीचा ताबा नातेवाईकांना दिला.

सोनू सूदकडे मदतीची मागणी करणारी ट्विट्स अचानक होऊ लागली डिलीट; नेमकं कारण काय?

मोदी-शहांना गुजरातमध्ये आव्हान देतोय मराठमोठा शिलेदार; काँग्रेससाठी बाजीगर ठरणार?

'ते' २९ IPS अधिकारी कामचुकार?; डीजीपींच्या लेटरबॉम्बनं पोलीस खात्यात खळबळ

 

Web Title: Woman who killed husband gave birth to a baby in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.