कौतुकास्पद! दुभती गाय विकून महिलेने सुनेसाठी बांधलं शौचालय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 02:58 PM2018-04-20T14:58:46+5:302018-04-20T14:58:46+5:30

शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून निधी मिळण्याची कुठलिही चिन्हं न दिसल्यामुळे तेतरीदेवी यांनी गाय विकण्याचा निर्णय घेतला.

Woman sells cow in Bihar to construct toilet | कौतुकास्पद! दुभती गाय विकून महिलेने सुनेसाठी बांधलं शौचालय

कौतुकास्पद! दुभती गाय विकून महिलेने सुनेसाठी बांधलं शौचालय

Next

गया- बिहारच्या गया जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या एका 60 वर्षीय महिलेने दुभती गाय विकून त्यातून मिळालेल्या पैशातून घरात शौचालय बांधलं आहे. तेतरी देवी असं त्या महिलेचं नाव असून त्यांनी घरातील उत्पन्नाचं एकमेव साधन असणारी गाय विकली. शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून निधी मिळण्याची कुठलिही चिन्हं न दिसल्यामुळे तेतरीदेवी यांनी गाय विकण्याचा निर्णय घेतला. 14 हजार रुपयांना गाय विकून त्यांनी घरात शौचालय बांधलं. तेतरी देवी या पाटणापासून 140 किलोमीटर दूर असणाऱ्या तेवारीछाक गावात राहतात.

तेतरीदेवी या त्यांचा पती, मुलगा व सुनेसह गेल्या अनेक वर्षापासून त्या गावात राहतात. तेतरीदेवी घरात शौचालय बांधण्यासाठी मंडलअधिकाऱ्यांकडे निधीची मागणी केली. पण त्यांनी महिलेच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं.  'माझी सून इयत्ता दहावीत शिकते. स्वच्छतेचं महत्त्व व घरात शौचालय असण्याचं महत्त्व तिला समजतं. तिने अनेकता शौचालय बांधण्याचं सांगितलं पण आम्ही अनेकदा ते ऐकलं नाही किंवा पैसे नसल्याचं कारण दिलं. नुकतंच तिने तिचे दागिने विकून शौचालयासाठी पैसे उभे करण्याची युक्ती सांगितली. पण आम्ही तसं न करता गाय विकण्याचा निर्णय घेतला, असं तेतरीदेवी यांनी सांगितलं. गाय विकण्याचा निर्णय घेणं माझ्यासाठीही कठीण होतं पण तरीही तो निर्णय मी घेतला, असंही त्या म्हणाल्या. 

दरम्यान, तेतरीदेवी या प्रत्येकासाठी एक उदाहरण आहेत, त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. त्यांच्या कार्याचं कौतुक आहे, अशी प्रतिक्रिया गटविकास अधिकारी पर्णव कुमार गिरी यांनी दिली आहे. 
 

Web Title: Woman sells cow in Bihar to construct toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.