दुस-यांच्या विचारांना कोणी नाकारु शकत नाही - प्रणव मुखर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 08:48 PM2017-07-24T20:48:25+5:302017-07-24T20:59:02+5:30

महात्मा गांधी यांची स्वप्ने साकारायची असतील तर आपल्याला गरिबाहून गरिब व्यक्तीला सशक्त बनविले पाहिजे. दुस-यांच्या विचारांना कोणी नाकारु शकत नाही.

Who can not deny the views of others - Pranab Mukherjee | दुस-यांच्या विचारांना कोणी नाकारु शकत नाही - प्रणव मुखर्जी

दुस-यांच्या विचारांना कोणी नाकारु शकत नाही - प्रणव मुखर्जी

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 -  महात्मा गांधी यांची स्वप्ने साकारायची असतील तर आपल्याला गरिबाहून गरिब व्यक्तीला सशक्त बनविले पाहिजे. दुस-यांच्या विचारांना कोणी नाकारु शकत नाही. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना पोहोचतील याची काळजी घ्यायला हवी, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या शेवटच्या सांगितले. यावेळी त्यांनी आगामी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांचे आभार मानले. 
समाज हिंसामुक्त व्हायला हवा, केवळ अहिंसक समाजच सर्वांची सुरक्षा आणि लोकशाही सुनिश्चित करू शकतो. अहिंसक समाजच भारताचे हित साध्य करु शकतो. देशातील पर्यावरणाची सुरक्षा अत्यंत आवश्यक आहे, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे. भारताची विविधता टिकवून ठेवा. संस्कृती, विश्वास आणि भाषा देशाची एक खास ओळख बनविते. भारताची आत्मा विविधता आणि सहिष्णूतामध्ये आहे. दुस-यांच्या विचारांना कोणी नाकारु शकत नाही, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले.
मी 2012 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला म्हणालो होतो की, लोकशाही कोणत्याही पदामध्ये नसते, आपण सर्व बरोबर असून देशाच्या विकासाठी आपली कर्तव्य पार पाडली पाहिजेत. ज्यावेळी मी राष्ट्रपतीपद स्विकारले तेव्हा जनतेच्या सुरक्षेचे वचन दिले होते. गेली पाच वर्ष त्यासाठी मी प्रत्येकवेळी जबाबदार राहिलो. नागरिकांनी दिलेल्या सहयोगामुळे मी त्यांचा नेहमी ऋणी राहील, असेही यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले. 
दरम्यान, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेल्या "सिलेक्टेड स्पीचेस" या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आहे.    
 

Web Title: Who can not deny the views of others - Pranab Mukherjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.