Budget 2018 : काय झालं स्वस्त आणि काय महाग ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 02:47 PM2018-02-01T14:47:08+5:302018-02-01T17:36:20+5:30

अर्थसंकल्पानंतर काय-काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं, यावर एक दृष्टिक्षेप

what become cheaper and what dearer in union budget 2018 | Budget 2018 : काय झालं स्वस्त आणि काय महाग ?

Budget 2018 : काय झालं स्वस्त आणि काय महाग ?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज सादर केला. केंद्र सरकारने शेतकरी वर्ग आणि ग्रामीण भागाल खूष करणारा अर्थसंकल्प मांडला पण त्याचवेळी टॅक्स स्लॅब म्हणजे कररचनेत कोणताही बदल न केल्याने नोकरदारांची निराशा केली. शिक्षण आणि आरोग्य अधिभारात 1 टक्क्यांनी वाढ केल्याने, प्रत्येक बिल वाढणार आहे. म्हणजे तुम्ही जे खरेदी कराल, त्या बिलावर 1 टक्के अधिभार असेल. पूर्वी हा अधिभार 3 टक्के असायचा तो आता 4 टक्के असेल.  बजेटमध्ये सरकारकडून एक मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मोबाइल, लॅपटॉप यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणं महाग होणार आहेत. कारण, अर्थसंकल्पात मोबाइल फोनवरील कस्टम ड्यूटी वाढवण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पानंतर काय-काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं, यावर एक दृष्टिक्षेप...

महाग  झालेल्या वस्तू  -

- शिक्षण आणि आरोग्यावरील सेस 3 वरुन 4 टक्क्यांवर, प्रत्येक बिल महागणार
- मोबाईलवरील कस्टम ड्यूटी 15 टक्क्यांवरून वाढवून 20 टक्के करण्यात आल्याने आता मोबाईल खरेदी महागणार 
- सिगारेटसह तंबाखूजन्य वस्तू
- परफ्युम, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरिज
- कार आणि टू व्हीलर अॅक्सेसरीज
- सफोला तेल
- सिगारेट, विडी
- गॉगल्स
- मनगटी घड्याळं
- ऑलिव्ह ऑइल
- सिगारेट लायटर
- व्हिडिओ गेम्स
-फ्रुट ज्युस आणि व्हेजिटेबल ज्युस
-टूथपेस्ट, टूथ पावडर
-सौंदर्यप्रसाधनं
-ट्रक आणि बसचे टायर
-चप्पल आणि बूट
-सिल्क कपडा
-इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड
-फर्निचर
-घड्याळं
-एलसीडी, एलईडी टिव्ही
-दिवे
-खेळणी, व्हीडीओ गेम
-क्रीडा साहित्य
-मासेमारी जाळं
-मेणबत्त्या
-चटई
स्वस्त झालेल्या वस्तू, सेवा -
-अनब्रँडेड डिझेल
-अनब्रँडेड पेट्रोल
-आरोग्य सेवा 
-एलएनजी, 
-प्रिपेएर्ड लेदर, 
-सिल्वर फॉइल, 
-पीओसी मशिन,
-फिंगर स्कॅनर, 
-आइरिश स्कैनर, 
-देशात तयार होणारे हिरे, 
-सोलार बॅटरी 
-ई-टिकटवरील सर्विस टॅक्स कमी
- काजू 

Web Title: what become cheaper and what dearer in union budget 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.