पश्चिम बंगालमध्ये आणखी एका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 09:56 AM2019-06-06T09:56:42+5:302019-06-06T10:04:47+5:30

पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

west bengal tmc worker killed in cooch behar party leader blames bjp | पश्चिम बंगालमध्ये आणखी एका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या

पश्चिम बंगालमध्ये आणखी एका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या

Next
ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.अजीजूर रहमान असं हत्या झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. भाजपाने ही हत्या केल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. 

कूचबिहार - लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसेचे अनेक प्रकार समोर आले होते. तसेच काही कार्यकत्यांची हत्या झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुचबिहारमधील पेटला बाजारा परिसरात बुधवारी (5 जून) एका कार्यकर्त्याची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. अजीजूर रहमान असं हत्या झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. तसेच भाजपाने ही हत्या केल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. 

मिळलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन दिवसांत तृणमूल काँग्रेसच्या दुसऱ्या कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. अजीजूर रहमान यांच्या नातेवाईकांनी तसेच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही हत्या भाजपाने केल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी अजीजूर यांच्या घरात घूसून त्यांना बेदम मारहाण करून हत्या केल्याचं म्हटलं आहे. तर भाजपाने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 


कूचबिहारमधील टीएमसीच्या एका नेत्याने भाजपाच्या अजहर अली यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने अजीजूरची हत्या केल्याचा आरोप केला आहे. तर भाजपाच्या निसीथ प्रमाणिक यांनी हा खोटा आरोप असल्याचं म्हटलं आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे अजीजूर रहमान यांचा हत्या झाली असेल. तृणमूल काँग्रेस याला राजकीय रंग देण्याचं काम करत आहे. भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा या हत्येशी संबंध नसल्याचं निसीथ प्रमाणिक यांनी म्हटलं आहे. 


पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित बिश्वास यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी एफआयआर दाखल केलं असून, दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच हन्सखली पोलीस स्टेशनचे ठाणेकर यांना निलंबित करण्यात आलं आहे. बिश्वास यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. सत्यजीत बिश्वास हे कृष्णगंज मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. नाडिया जिल्ह्यात ही घटना घडली होती. सरस्वती मातेची पूजा सुरू असताना त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांना तात्काळ शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. 

सत्यजित बिश्वास यांची हत्या भाजपाच्या सांगण्यावरूनच केल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसने केला होता. सत्यजित यांना गंभीर जखमी अवस्थेत शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सत्यजित यांच्या हत्येमागे भाजपाच्या मुकूल रॉय यांचा हात असल्याचा आरोप तृणमूलचे जिल्हाध्यक्ष गिरीशंकर दत्ता यांनी केला होता. तृणमूलमधील काही विश्वासघातकी लोकांनी भाजपाच्या या कामासाठी मदत केल्याचा आरोपही तृणमूल काँग्रेसने ट्विटवरून केला होता.
 

Web Title: west bengal tmc worker killed in cooch behar party leader blames bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.