'ते रामनवमीला दंगली घडवतील, पण...', ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 10:46 PM2024-04-07T22:46:26+5:302024-04-07T22:50:27+5:30

ममतांनी आरोप केला की, केंद्रीय तपास संस्था टीएमसी नेत्यांना धमकावून भाजपमध्ये सामील होण्याचा दबाव टाकत आहेत.

West Bengal Loksabha Election 2024: 'They will create riots on Ram Navami, but...', Mamata Banerjee makes serious accusation against BJP | 'ते रामनवमीला दंगली घडवतील, पण...', ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप

'ते रामनवमीला दंगली घडवतील, पण...', ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप

West Bengal Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारसभा घेत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आज पुरुलियामध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ईडी आणि इनकम टॅक्स भाजपचे फंडिंग बॉक्स आहेत. आमच्याकडे लक्ष्मी भंडार आहे, तर त्यांच्याकडे ईडी आणि सीबीआय भंडार आहे. केंद्रीय तपास यंत्रणा टीएमसी नेत्यांना भाजपमध्ये सामील होण्यास किंवा कारवाईला सामोरे जाण्याच्या धमक्या देतात. ईडी, सीबीआय, एनआयए आणि आयकर विभाग भाजपचे हत्यार म्हणून काम करत असल्याचा आरोप ममतांनी यावेळी केला.

रामनवमीला भाजप दंगली घडवतील...
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, 17 एप्रिल रोजी रामनवमीला भाजप जातीय दंगे भडकावण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही कोणाच्याही बोलण्यात येऊ नका. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रभू रामाने दंगली भडकवायला सांगितले नव्हते, पण भाजपवाले तोच प्रयत्न करतील. जनतेने कोणत्याही चिथावणीला बळी पडू नये, असे आवाहन ममतांनी केले. तसेच, लोक सरकारविरोधात आंदोलन करतात, तेव्हा एनआयएला पाठवले जाते. रात्री उशिरा महिला जेव्हा घरात एकट्या असतात, तेव्हा स्थानिक पोलिसांना न कळवता भाजप एनआयए अधिकाऱ्यांना त्रास देण्यासाठी पाठवते, असा आरोपही त्यांनी केला.

बंगालमध्ये इंडिया आघाडी नाही
बंगालमध्ये इंडिया आघाडी नसल्याचेही ममतांनी स्पष्ट सांगितले. बंगालमध्ये सीपीआय(एम)-काँग्रेस-भाजप एकत्र लढत आहेत, आम्ही त्यांच्या युतीविरोधात लढत आहोत. आपल्याला टीएमसी आणखी बळकट केली पाहिजे. असे झाले नाही, तर आपल्याला माहीत आहे की, भारताचे अस्तित्व संपुष्टात येईल. आता भाजपने समान नागरी कायदा आणला, CAA देखील आणला, यामुळे लोक बेघर होतील आणि त्यांचे नागरिकत्व धोक्यात येईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

Web Title: West Bengal Loksabha Election 2024: 'They will create riots on Ram Navami, but...', Mamata Banerjee makes serious accusation against BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.