हो आम्ही चुकलो ! केजरीवालांनी अखेर केला पराभव मान्य

By admin | Published: April 29, 2017 08:50 AM2017-04-29T08:50:51+5:302017-04-29T08:50:51+5:30

पंजाब, गोवा आणि दिल्ली महापालिका निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली चूक झाली असल्याचं मान्य केलं आहे

We're wrong! Kejriwal finally got defeated | हो आम्ही चुकलो ! केजरीवालांनी अखेर केला पराभव मान्य

हो आम्ही चुकलो ! केजरीवालांनी अखेर केला पराभव मान्य

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29- पंजाब, गोवा आणि दिल्ली महापालिका निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली चूक झाली असल्याचं मान्य केलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक पत्र शेअर केलं असून आम्ही चुकलो सांगत पराभव स्विकारला आहे. "गेल्या दोन दिवसांत मी अनेक स्वयंसेवक आणि मतदारांशी बातचीत केली. आम्ही अनेक चुका केल्या हे वास्तव आहे. आमच्या चुकांचं आत्मपरिक्षण करुन त्या गोष्टी सुधरवण्याचा प्रयत्न करु", असं अरविंद केजरीवाल बोलले आहेत.
 
केजरीवाल यांनी लिहिलं आहे की, "आमच्या चुका सुधारण्याची वेळ आली आहे. हे बोलणं गरजेचं आहे. आम्हाला चिंतन केलं पाहिजे. बहाण्यांची नाही तर अॅक्शन घेण्याची गरज आहे. पुन्हा एकदा आपल्या कामाला लागलं पाहिजे. आम्ही अनेकवेळा घसरलो असून स्वत:ला ओळखून पुन्हा उभं राहणं महत्वाचं आहे". दिल्ली महापालिकेतील पराभवामुळे सरकारच्या कामावर काहीच प्रभाव पडणार नाही असा विश्वास केजरीवाल यांनी जनतेला दिला आहे. 
 
दिल्ली महापालिकेतील पराभवानंतर अनेकांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता. पक्षाची स्थापना करताना असलेल्या मुख्य सदस्यांपैकी एक कुमार विश्वास यांनीही शुक्रवारी केजरीवाल यांच्यावर चुकीच्या लोकांना तिकीट देण्याचा आरोप लावला. निवडणुकीत ईव्हीएम नाही तर जनतेने हरवलं असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. कुमार विश्वास यांच्याव्यतिरिक्त केजरीवाल यांचे निकटवर्तीय राहिलेला आपचे माजी नेता मयंक गांधी यांनातर केजरीवालांना सत्तेची लालसा असल्याची टीका केली होती. तसंच पक्षाचे खासदार भगवंत मान यांच्यासहित अनेकांनी पक्षात सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता.
 
दिल्ली महानगरपालिका निवडणुकांमध्ये सपाटून मार खाणा-या आम आदमी पार्टीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येऊ लागला आहे. शिवाय पक्षनेतृत्वाविरोधातही उघड-उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. आम आदमी पार्टीविरोधी भूमिका घेत विश्वास यांनी म्हटले आहे की, "दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत ईव्हीएमने नाही तर जनतेनं "आप"ला हरवले आहे." 
 
शिवाय केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईकवरुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लोबाल करायला नको होते, असेही विश्वास म्हणाले आहेत. एक वृत्तवाहिनीशी बोलताना विश्वास यांनी सांगितले की, पार्टीमध्ये व्यापक बदल करण्यासाठी प्रयत्न करणं गरजे आहे. ईव्हीएममुळे आमचा पराभव झाला नाही. तर आम्हाला जनतेचं समर्थन नाही मिळाले. आम्ही आपल्या कार्यकर्त्यांसोबत व्यवस्थित संवाद  साधू शकलो नाहीत". 
 
 विश्वास यांनी पार्टीचे निर्णय बंद खोलीत घेतल्याचा आरोप करत सांगितले की, अनेक निर्णय बंद खोलीत झाले.  दिल्ली मनपा निवडणुकीत अयोग्य उमेदवारांना तिकीट देण्यात आले. ईव्हीएममध्ये गोंधळ असणं हा निवडणुकीचा भाग आहे. याविरोधात आवाज उठवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. निवडणूक आयोग, कोर्ट आहे जेथे आपण आपले म्हणणे मांडू शकतो. 
 

Web Title: We're wrong! Kejriwal finally got defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.