भारतातल्या 'या' काकांना नासा शोधतंय?; बघा त्यांचा अचाट 'पराक्रम'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 05:00 PM2018-08-29T17:00:39+5:302018-08-29T17:01:00+5:30

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

viral video of uncle fire rockets with cigrette | भारतातल्या 'या' काकांना नासा शोधतंय?; बघा त्यांचा अचाट 'पराक्रम'

भारतातल्या 'या' काकांना नासा शोधतंय?; बघा त्यांचा अचाट 'पराक्रम'

Next

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवरही हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सिगारेटनं रॉकेट उडवताना पाहायला मिळतेय.

या व्हिडीओला फेसबुकवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे रॉकेट उडवणा-या व्यक्तीच्या हातात अनेक रॉकेट्स आहेत आणि तो सिगारेट ओढता ओढता हातातूनच रॉकेट उडवत आहे. सिगारेटनं एकामागोमाग एक तो रॉकेट उडवत असताना तो व्हिडीओ सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. तसेच या काकांना सिगारेटनं रॉकेट उडवताना पाहून आजूबाजूची लोकही अवाक् झाली होती.

या खतरनाक स्टंटमधील छोटीशी चूक अपघाताला निमंत्रण देणारी ठरली असती. तुम्ही अशा प्रकारचे कोणतेही स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका. या व्हिडीओला फेसबुकवर दीड लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. जवळपास 4 हजार शेअर्स आणि 3 हजारांहून अधिक प्रतिक्रिया या व्हिडीओला आल्या आहेत. 

Web Title: viral video of uncle fire rockets with cigrette

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.