व्हिडिओ - अहमदाबादमध्ये हिट अॅण्ड रन प्रकरण

By admin | Published: May 18, 2016 04:48 PM2016-05-18T16:48:30+5:302016-05-18T18:02:56+5:30

अहमदाबादमध्ये स्कुटीवरुन जाताना भरधाव कारने दिलेल्या धडकेत 2 तरुणी जखमी झाल्या आहेत, ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे

Video - hit and run case in Ahmedabad | व्हिडिओ - अहमदाबादमध्ये हिट अॅण्ड रन प्रकरण

व्हिडिओ - अहमदाबादमध्ये हिट अॅण्ड रन प्रकरण

Next
>ऑनलाइन लोकमत - 
अहमदाबाद, दि. 18 - स्कुटीवरुन जाताना भरधाव कारने दिलेल्या धडकेत दोन तरुणी जखमी झाल्या आहेत. कारने दिलेली धडक इतकी जोरदार होती की तरुणी हवेत उडाल्या आणि कारच्या बोनेटवर आदळल्या. स्कुटीदेखील 10 फुटाहून जास्त दूर फेकली गेली. सुदैवाने या तरुणी अपघातातून बचावल्या. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 
 
दोन तरुणी अँगल थिएटरच्या दिशेने अॅक्टिव्हावर जात असताना भरधाव कारने अॅक्टिव्हाला धडक मारली. कारचा वेग इतका जास्त होता की स्कुटीवरील तरुणींना काही कळण्याआधीच धडक बसली. अपघातस्थळी लोक नसल्याने वाहनचालकाने अपघातानंतर गाडी अजिबात न थांबवता पळ काढला. 
 
सुदैवाने दोन्ही तरुणी सुरक्षित असून जखमी झाल्या आहेत. दोन्ही तरुणींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधरावर पोलिस चालकाचा शोध घेत आहेत. 
 

Web Title: Video - hit and run case in Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.