VIDEO : अर्णव गोस्वामी म्हणजे मच्छी विकणारा अँकर, पाक पत्रकाराची टीका

By admin | Published: May 31, 2017 08:53 AM2017-05-31T08:53:51+5:302017-05-31T09:45:02+5:30

पाकिस्तानमधील पत्रकार आमिर लियाकतने आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले भारतीय पत्रकार व "रिपब्लिक" वृत्तवाहिनी संपादक अर्णव गोस्वामी यांना टार्गेट केले आहे.

VIDEO: Arnaav Goswami means a flyer who sells a mosquito, a Pakistani journalist's comment | VIDEO : अर्णव गोस्वामी म्हणजे मच्छी विकणारा अँकर, पाक पत्रकाराची टीका

VIDEO : अर्णव गोस्वामी म्हणजे मच्छी विकणारा अँकर, पाक पत्रकाराची टीका

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 31 - पाकिस्तानमधील पत्रकार आमिर लियाकत नेहमीच भारतासंबंधी प्रचंड आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग करत असतो. यावेळी आमिरनं आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले भारतीय पत्रकार व  "रिपब्लिक" वृत्तवाहिनी संपादक अर्णव गोस्वामी यांना टार्गेट केले आहे. 
 
काही दिवसांपूर्वी अर्णव यांनी आपल्या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पाकिस्तानी जनरलला फटकारल्यानं लियाकतनं अर्णव यांच्यावर निशाणा साधला आहे. 
 
अर्णव यांना टार्गेट करत आमिरनं पाकिस्तानातील वृत्तवाहिनीवर त्यांच्या कार्यक्रमाची व्हिडीओ क्लिपदेखील प्रसारित केली. अर्णव यांच्या कार्यक्रमातील व्हिडीओ क्लिप वृत्तवाहिनीवर प्रसारित करुन त्यानं अर्णव गोस्वामी यांच्याप्रती अभद्र भाषेचा प्रयोगही केला. 
(एअर इंडिया विका, निती आयोगाचा सल्ला)
 
कार्यक्रमादरम्यान आक्रमक होणा-या अर्णव यांच्यावर टिप्पणी करत आमिरने सुरुवातीला त्यांना ""मासे विक्री करणारा"" असा उल्लेख करत त्यांचा अपमान केला. 
 
यानंतर त्यानं अर्णव यांना उद्धट आणि असभ्यदेखील म्हटले.  आमिर पुढे असंही म्हणाला की, ""आरडाओरडा केल्यानं व जोरजोरात बोलल्यानं काहीही होत नाही, मनुष्याला शहाणपणानं संवाद करता आला पाहिजे, जे तुमच्याकडे नाही"". 
आमिर इथंवरच नाही थांबला नाही तर पुढे तो असंही म्हणाला की, ""भारतातील बहुतांश लोकं तुझा राग करतात आणि करायलादेखील हवा. माझ्यासोबत एकदा चर्चा कर आणि वेळ तू ठरव. माझ्यासमोर येऊन डोळ्यात डोळे टाकून बोल"", असे काहीही बरळत त्यानं अर्णव यांना चर्चेचं आव्हान दिलं आहे.
 
 
अर्णव गोस्वामी यांना दहशतवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी
दरम्यान यापूर्वी पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेने अर्णव गोस्वामी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमकीनंतर अर्णव गोस्वामी यांच्या सुरक्षेत केंद्र सरकारने वाढ करुन त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. 
 
उरी हल्ल्यानंतर गोस्वामी यांनी  वृत्तवाहिनी कार्यक्रमातून पाकिस्तान सरकार आणि तेथील दहशतवादी संघटनांवर हल्लाबोल केला होता.   या पार्श्वभूमीवर गोस्वामी यांना धमकी देण्यात आली होती.   
 
 

Web Title: VIDEO: Arnaav Goswami means a flyer who sells a mosquito, a Pakistani journalist's comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.