Video : मत मागायला आले अनुपम खेर, दुकानदाराने 2014 चा जाहीरनामाच दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 04:01 PM2019-05-08T16:01:48+5:302019-05-08T16:02:46+5:30

अनुपम खेर यांना दुकानदाराच्या या प्रश्नावर निशब्द होऊन परतावे लागले. हरयाणाच्या चंडीगढ या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी किरण खेर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.

Video: Anupam Kher came for the vote, the shopkeeper announced in the menifesto of 2014 bjp | Video : मत मागायला आले अनुपम खेर, दुकानदाराने 2014 चा जाहीरनामाच दाखवला

Video : मत मागायला आले अनुपम खेर, दुकानदाराने 2014 चा जाहीरनामाच दाखवला

चंदीगड - अभिनेता आणि भाजपा खासदार किरण खेर यांचे पती अनुपम खेर निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत. आपल्या पत्नीच्या प्रचारार्थ ते रॅली आणि सभांना संबोधित करत आहेत. मात्र, पुन्हा एकदा अनुपम खेर यांच्यावर नामुष्कीची वेळ आल्याचे पाहायला मिळाले. एका दुकानदाराने अनुपम खेर यांना 2014 चा जाहीरनामाच दाखवला. तसेच, गत निवडणुकांवेळी दिलेल्या वचनांचं काय? असा प्रश्नही या दुकानदाराने अनुपम खेर यांना विचारला आहे. 

अनुपम खेर यांना दुकानदाराच्या या प्रश्नावर निशब्द होऊन परतावे लागले. हरयाणाच्या चंडीगढ या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी किरण खेर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांसमवेत अनुपम खेर निवडणूक प्रचारासाठी मतदारसंघाचा दौरा करत होते. त्यावेळी, एका किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदाराने अनुपम खेर यांना प्रश्न विचारून गोंधळात टाकले. या दुकानदाराने 2014 च्या निवडणुकांवेळीचा भाजपाचा जाहीरनामाच समोर केला. तसेच, गेल्या जाहीरनाम्यातील प्रश्न अद्याप सुटले नसल्याचे सांगितले. त्यावर, अनुपम खेर यांना अपमान सहन करावा लागल्याने ते तेथून परत फिरले. 


 
दरम्यान, अभिनेता अनुपम खेर यांच्या दोन सभा भाजपाकडून रद्द करण्यात आल्या आहेत. चंदीगड येथे पत्नी किरण खेर यांच्या प्रचारार्थ अनुपम खेर यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सभांच्याठिकाणी अपेक्षानुरूप नागरिकांची गर्दी न झाल्याने भाजपाने या सभाच रद्द केल्या. खेर यांनी ट्विट करुन ही बातमी खरी असल्याचे म्हटले. पण, माझ्या दुसऱ्या सभेला गर्दी होती, असे म्हणत त्यांनी दुसऱ्या सभेचे फोटोही शेअर केले आहेत. चंडीगड येथे सातव्या टप्प्यात 19 मे रोजी चंडीगड येथे मतदान होणार आहे. या मतदारसंघात सध्या किरण खेर भाजपाच्या विद्यमान खासदार आहेत. 
 

Web Title: Video: Anupam Kher came for the vote, the shopkeeper announced in the menifesto of 2014 bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.