uttar pradesh student of class 10th accused of killing the father of her girlfriend | 'माझ्या वडिलांना ठार मार, तेव्हाच लग्न करेन', प्रियकराकडे प्रेयसीची अजब मागणी
'माझ्या वडिलांना ठार मार, तेव्हाच लग्न करेन', प्रियकराकडे प्रेयसीची अजब मागणी

लखनौ -  उत्तर प्रदेशातील शामलीमध्ये थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. इयत्ता दहावीमध्ये शिकणा-या एका मुलाला आपल्या गर्लफ्रेंडच्या वडिलांची हत्या केल्याच्या आरोपामध्ये अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांच्या हत्याकांडमध्ये स्वतः त्यांची मुलगीदेखील सहभागी होती.  

इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आपल्या गर्लफ्रेंडच्या वडिलांची हत्या केली आहे. दरम्यान, गर्लफ्रेंडच्याच सांगण्यावरुन तिच्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. ''आधी माझ्या वडिलांना ठार मार, तेव्हाच लग्न करेन', असे या मुलीनं आरोपी मुलाला सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

ज्या हत्यारानं विद्यार्थ्यानं गर्लफ्रेंडच्या वडिलांचा जीव घेतला, ते हत्यारदेखील मुलीनंच त्याला पुरवल्याची गंभीर बाबदेखील पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या हत्याकांडप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.
 

English summary :
girlfriend make weird demand to his fiance


Web Title: uttar pradesh student of class 10th accused of killing the father of her girlfriend
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.