UPSC मध्ये अक्षत जैन यानं पटकावला दुसरा क्रमांक, सांगितलं यशाचं रहस्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 01:27 PM2019-04-07T13:27:28+5:302019-04-07T13:28:18+5:30

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) घेण्यात आलेल्या परिक्षेत राजस्थानच्या अक्षत जैन यानं दुसरा क्रमांक पटकावला आहे.

upsc civil services result 2018 2nd topper akshat jain exclusive interview with lokmat hindi success | UPSC मध्ये अक्षत जैन यानं पटकावला दुसरा क्रमांक, सांगितलं यशाचं रहस्य 

UPSC मध्ये अक्षत जैन यानं पटकावला दुसरा क्रमांक, सांगितलं यशाचं रहस्य 

googlenewsNext

- आदित्य द्विवेदी

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) घेण्यात आलेल्या परिक्षेत राजस्थानच्या अक्षत जैन यानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. 23 वर्षीय अक्षत जैन यानं या परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी दुसऱ्यांदा प्रयत्न केला आहे. याआधी 2017 मध्ये त्यानं परीक्षा दिली होती. त्यावेळी प्रीलिम्स क्वालिफाय करता आलं नाही. त्यानंतर अक्षत जैन यानं या परिक्षेसाठी पुस्तकांसह इंटरनेटच्या मदतीनं अभ्यासाला सुरुवात केली आणि दुसरा क्रमांक पटकावून मोठं यश संपादन केलं. दरम्यान, लोकमत न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अक्षत जैन यानं आपल्या यशाचं रहस्य सांगितलं आहे. 

परिक्षेसाठी कितवा प्रयत्न होता आणि पर्यायी विषय कोणता होता?
हा माझा दुसरा प्रयत्न होता. याआधी 2017 मध्ये मी तीन महिन्यांच्या तयारीनंतर परिक्षा दिली आणि दोन अंकानी प्रीलिम्स क्वालिफाय करु शकलो नाही. त्यामुळं टेक्निकली हा माझा पहिला प्रयत्न होता असं मी मानतो. माझा पर्यायी विषय एंथ्रोपोलॉजी होता. 

तुझं शिक्षण कोठून झालं आहे?
आयआयटी गुवाहाटीमधून 2017 मध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. तिसऱ्या वर्षात असताना मी ठरवलं होतं की, लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची. त्यानुसार तयारी करण्यास सुरुवात केली होती.

नागरी सेवेत जाण्याचा निर्णय का घेतला?
माझी आई आणि वडील दोघंही नागरी सेवेत आहेत. त्यांचं काम पाहून मला प्रेरणी मिळाली. त्यामुळं मी सुद्धा नागरी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला.

तुझी, रोजची तयारी कशी होती?
दररोज 8-10 तासांहून अधिक वेळ अभ्यास करत होतो. तयारीसाठी टॉपिकनुसार अभ्यास सुरु होता.

पर्यायी विषयाच्या तयारीसाठी काय धोरण होतं?
पर्यायी विषयासाठी मी प्रीलिम्सच्याआधी तयारी केली होती. यासाठी मी मॉडल आन्सरवर जास्त फोकस केला. माझ्याजवळ आन्सर बँक होती. टेस्ट सुद्धा देत होतो. यामुळे माझी मदत झाली. 

परिक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लास की सेल्फ स्टडी?
सामान्य ज्ञान यासाठी मी कोचिंग क्लास लावला नाही. पर्यायी विषयासाठी मी दिल्लीत काही महिने कोचिंग क्लास लावला होता. याशिवाय टेस्ट सिरीजसाठी सुद्धा प्रवेश घेतला होता. 

पुस्तक की इंटरनेट: कशावर जास्त अवलंबून होतास?
दोन्ही तितकच गरजेचं आहे. बेसिक नोट्ससाठी पुस्तकांचा वापर जास्त गरजेचा आहे. करेंट अफेअर्ससाठी इंटरनेटचा वापर केला पाहिजे. 

परिक्षेत यश संपादन करण्यासाठी कोण-कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं?
अनेक मॉक्स इंटरव्यू दिलेत. बॉयोडेटावर खास लक्ष दिलं. माझं असं मत आहे की, इंटरव्यूमध्ये नॉलेजपेक्षा जास्त पर्सनॉलिटीवर फोकस जास्त असतो. त्यासाठी प्रत्येकानं नॉलेज आणि पर्सनॉलिटीकडे लास्त फोकल केलं पाहिजे.

कुटुंबात कोण-कोण आहे?
मी मूळचा राजस्थानचा आहे. माझ्या कुटुंबात आई, वडील, नाना आणि लहान भाऊ आहे.

यशाचं श्रेय कोणाला देशील?
माझ्या कुटुंबातील सदस्यांनी परिक्षेत उतीर्ण होईपर्यंत मला भरपूर मदत केली. वडिलांनी जास्त सपोर्ट केलाय. 

दुसऱ्या क्रमांक येईल असं वाटलं होतं का?
माझ्या मते, कोणताही विद्यार्थी असो टॉप करण्याचा विचार करतोच. मला विश्वास होता की माझं नाव लिस्टमध्ये येईल. निकाल पाहिल्यानंतर विश्वास बसत नव्हता. माझ्यासाठी एक आश्चर्य होतं.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेस का?
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. मात्र, स्टेटस किंवा फोटो अपलोड करत नाही. फक्त अभ्यास करताना कंटाळा आला तरच थोडासा सोशल मीडियाचा वापर करत होतो. मित्रांची विचारपूस करण्यासाठी.

परीक्षार्थी विद्यार्थ्यांना काय संदेश देशीस?
सर्वांत महत्वाचं म्हणजे एक धोरण ठरवा. धोरणाशिवाय आरल्याला हवं तसं यश मिळणार नाही. सुरुवातील अभ्यासक्रम पूर्ण करावा. याशिवाय मी कधीही रिजल्टचा विचार करत नव्हतो. रोज ठरवून अभ्यास करा. जास्त तणाव घेऊ नये.

अभ्यासादरम्यान थकवा आल्यास काय करत होतास?
फुटबॉल माझ्या आवडलीचा खेळ आहे. त्यामुळे फुटबॉल मॅच पाहात होतो. 

Web Title: upsc civil services result 2018 2nd topper akshat jain exclusive interview with lokmat hindi success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.