उन्नाव पीडितेची आई पिछाडीवर; NOTA पेक्षाही कमी मिळाली मतं, भाजप आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 04:46 PM2022-03-10T16:46:09+5:302022-03-10T16:55:42+5:30

Unnao Election Result : आशा सिंह यांनी सुरुवातीला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत निराशा पदरी पडली आहे. कारण मतमोजणीच्या दहाव्या फेरीपर्यंत त्यांना फक्त ४३८ मते मिळाली.

Unnao victim's mother on the back; Less votes than NOTA, BJP leads | उन्नाव पीडितेची आई पिछाडीवर; NOTA पेक्षाही कमी मिळाली मतं, भाजप आघाडीवर

उन्नाव पीडितेची आई पिछाडीवर; NOTA पेक्षाही कमी मिळाली मतं, भाजप आघाडीवर

googlenewsNext

उन्नाव विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसचा उमेदवार म्हणून उन्नाव बलात्कार पीडितेची आई आशा सिंह या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. आशा सिंह यांनी सुरुवातीला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत निराशा पदरी पडली आहे. कारण मतमोजणीच्या दहाव्या फेरीपर्यंत त्यांना फक्त ४३८ मते मिळाली.

उल्लेखनीय म्हणजे उन्नाव बलात्कार प्रकरणात एका १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता आणि भाजपचे माजी आमदार कुलदीप सेंगर यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार भाजप सध्या उन्नाव विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहे. भाजपचे पंकज गुप्ता यांना आतापर्यंत ४२,०२१ मते मिळाली आहेत, तर समाजवादी पक्षाचे अभिनव कुमार सध्या ३०,६१२ मतांनी पिछाडीवर आहेत. काँग्रेस उमेदवाराच्या मतांची संख्या NOTA पेक्षाही कमी होती.

UP Election : The mother of the Unnao rape victim is candidate of UP election by congress, priyanka gandhi behind her | UP Election : उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला काँग्रेसचं तिकीट, आशा सिंह म्हणतात...

प्रियंका गांधींनी काँग्रेसकडून महिलांना निवडणुकीत स्थान देण्यात येत असल्याचं म्हटलं होतं. तसेच, या महिलांमध्ये एक नाव विशेष आहे, ते म्हणजे 2017 च्या उन्नाव बलात्कार पीडित मुलीची आई आशा सिंह यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. तसेच, काही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनाही काँग्रेसने तिकीटे दिली. दरम्यान, 2017 उन्नाव बलात्कारप्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेंगर यास दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

देशभरात गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सिंह सेंगरमुळे भाजपाची कोंडी झाली होती. त्यानंतर भाजपाने या सेंगरला पक्षातून हाकलले होते. मात्र आता त्याच कुलदीप सिंह सेंगरच्या पत्नीला भाजपाने जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली होती. कुलदीप सिंह सेंगर याची पत्नी सध्या जिल्हा परिषदेची अध्यक्ष आहे. २०१६ मध्ये ती जिल्हा परिषदेची अपक्ष अध्यक्ष बनली होती. कुलदीप सिंह सेंगर भाजपाचे आमदार होता. पण बलात्कार प्रकरणात नाव आल्यानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. 

Read in English

Web Title: Unnao victim's mother on the back; Less votes than NOTA, BJP leads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.