मुंबईतील ४ स्मारकांना युनेस्कोचा पुरस्कार ; देशातील एकूण ७ स्थळे समाविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 07:12 AM2017-11-03T07:12:43+5:302017-11-03T07:13:07+5:30

युनेस्कोने प्रतिवर्षाप्रमाणे आशिया पॅसिफिक देशातल्या सांस्कृतिक वारसा जपणाºया स्मारकांच्या पुरस्कारांची घोषणा केली. त्यात भारतातील ७ स्मारक स्थळांचा तर मुंबईतील ४ स्थळांचा समावेश आहे.

UNESCO award for 4 memorials in Mumbai; The total of 7 sites included in the country | मुंबईतील ४ स्मारकांना युनेस्कोचा पुरस्कार ; देशातील एकूण ७ स्थळे समाविष्ट

मुंबईतील ४ स्मारकांना युनेस्कोचा पुरस्कार ; देशातील एकूण ७ स्थळे समाविष्ट

- सुरेश भटेवरा

नवी दिल्ली : युनेस्कोने प्रतिवर्षाप्रमाणे आशिया पॅसिफिक देशातल्या सांस्कृतिक वारसा जपणाºया स्मारकांच्या पुरस्कारांची घोषणा केली. त्यात भारतातील ७ स्मारक स्थळांचा तर मुंबईतील ४ स्थळांचा समावेश आहे.
आशिया पॅसिफिक क्षेत्रात सांस्कृतिक वारसास्थळांचा विकास आणि संवर्धनासाठी स्थानिक जनता व खासगी क्षेत्रातील संस्थांना युनेस्कोतर्फे दरवर्षी प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा भाग म्हणून दरवर्षी निवडक स्मारक स्थळांना सांस्कृतिक वारसा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

उल्लेखनीय व गुणवत्ता पुरस्कार
युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा जपणाºया मुंबईतील ज्या ४ स्मारक स्थळांचा समावेश आहे, त्यात भायखळ्याचे ख्रिस्त चर्च, चर्नी रोडजवळचे रॉयल आॅपेरा हाउस या दोन स्थळांना विशेष गुणवत्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
बोमनजी होरमजी वाडिया फाउंटन अ‍ॅण्ड क्लॉक टॉवर तसेच वेलिंग्डन फाउंटन या दोन वारसास्थळांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

Web Title: UNESCO award for 4 memorials in Mumbai; The total of 7 sites included in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई