वाराणसीमध्ये पुलाचा भाग कोसळला, 12 जणांचा मृत्यू, 50 जण अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 06:52 PM2018-05-15T18:52:27+5:302018-05-15T19:51:30+5:30

वाराणसीमधील केंट रेल्वे स्टेशनजवळील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.

Under construction flyover collapses in #Varanasi, casualties feared: Police | वाराणसीमध्ये पुलाचा भाग कोसळला, 12 जणांचा मृत्यू, 50 जण अडकल्याची भीती

वाराणसीमध्ये पुलाचा भाग कोसळला, 12 जणांचा मृत्यू, 50 जण अडकल्याची भीती

Next

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीमध्ये पुलाचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.  केंट रेल्वे स्टेशनजवळील पुलाचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावपथक घटनास्थळी पोहचले आहे. जखमींना जवळील रुग्णलयात पोहचवण्याचे काम सुरु आहे.  

केंट रेल्वे स्टेशनजवळील पुलाचे बांधकाम सुरु होते. त्याचवेळी अचानक पुवाचा पिलर कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लोक घाबरले आणि जिवाच्या आकांताने इकडेतिकडे पळू लागले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. वाराणसीतील केंट रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत.

 

Web Title: Under construction flyover collapses in #Varanasi, casualties feared: Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.