दोन पाकिस्तानी घुसखोर ठार, पंजाबमार्गे भारतात घुसण्याचा करत होते प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 04:06 AM2017-09-21T04:06:07+5:302017-09-21T04:06:09+5:30

काश्मीरमध्ये घुसखोरी करणे अवघड वा अशक्य होऊ लागल्याने पाकिस्तानी नागरिकांनी आता पंजाबमार्गे भारतात घुसण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Two Pakistani infiltrators were trying to infiltrate into India through Punjab, killing them | दोन पाकिस्तानी घुसखोर ठार, पंजाबमार्गे भारतात घुसण्याचा करत होते प्रयत्न

दोन पाकिस्तानी घुसखोर ठार, पंजाबमार्गे भारतात घुसण्याचा करत होते प्रयत्न

Next

अमृतसर : काश्मीरमध्ये घुसखोरी करणे अवघड वा अशक्य होऊ लागल्याने पाकिस्तानी नागरिकांनी आता पंजाबमार्गे भारतात घुसण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अशाच दोन पाकिस्तानी घुसखोरांना सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पंजाबमधील पाकिस्तान सीमेवर बुधवारी ठार केले. त्यांच्याकडे सापडलेली शस्त्रास्त्रे पाहता, ते दहशतवादीच होते. ते पंजाबमधून काश्मीरकडे जाणार होते का, हे मात्र समजू शकले नाही.
हे घुसखोर भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना शरण येण्यास सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत ते बीएसएफच्या तुकडीकडे येऊ लागले, असे बीएसएफचे पोलिस महासंचालक जे. एस. ओबेरॉय म्हणाले. ही घटना अमृतसरच्या अजनाला सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवरील शाहपूर येथे घडली. (वृत्तसंस्था)

Web Title: Two Pakistani infiltrators were trying to infiltrate into India through Punjab, killing them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.