पाकिस्तानच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद, तीन नागरिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 06:18 AM2018-06-03T06:18:20+5:302018-06-03T06:26:05+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. येथील अखनूर परिसरात पाकिस्तानच्या रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

Two jawans of Border Security Force martyred in Pakistan firing | पाकिस्तानच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद, तीन नागरिक जखमी

पाकिस्तानच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद, तीन नागरिक जखमी

googlenewsNext

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. येथील अखनूर परिसरात पाकिस्तानच्या रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रात्रभर सुरू असलेल्या या गोळीबारात नियंत्रण रेषेजवळ असलेल्या गावांमध्येही मोठे नुकसान झाले असून, या गोळीबारात तीन नागरिक जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील अखनूर आंतरराष्ट्रीय सीमाभागात पाकिस्तानच्या रेंजर्सकडून शनिवारी रात्री उशिरा भारतीय चौक्यांवर जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले. तसेच नियंत्रण रेषेवरील गावातील तीन नागरिकही या गोळीबारात जखमी झाले आहेत.




दरम्यान, काही दिवसांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टर परिसरात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता. 



 



 

Web Title: Two jawans of Border Security Force martyred in Pakistan firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.