कर्नाटक सरकारवर टांगती तलवार; दोन अपक्षांनी काढून घेतला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 06:19 AM2019-01-16T06:19:32+5:302019-01-16T06:19:51+5:30

भाजपा नेतेही कामाला; सत्तेला धक्का नाही - कुमारस्वामी

Two independents withdrew support of Karnataka government | कर्नाटक सरकारवर टांगती तलवार; दोन अपक्षांनी काढून घेतला पाठिंबा

कर्नाटक सरकारवर टांगती तलवार; दोन अपक्षांनी काढून घेतला पाठिंबा

Next

बंगळुरू : लोकसभा निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर असताना कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार अडचणीत आले आहे. त्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या दोन अपक्षांनी आपण पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यातील एक आमदार भाजपाची पाठराखण करणार आहे. मात्र सरकार स्थिर असल्याचा दावा मुख्यमंत्री कुमारस्वामींनी केला आहे.


एच. नागेश व आर. शंकर अशी त्या आमदारांची नावे आहेत. सध्याच्या आघाडी सरकारमध्ये समन्वय नसून स्थिर सरकारसाठी भाजपाला पाठिंबा देण्याचे एच. नागेश यांनी ठरविले आहे. मी कुमारस्वामी सरकारला दिलेला पाठिंबा काढला असे आर. शंकर म्हणाले. त्यांनी आपला हा निर्णय राज्यपाल वजुभाई वाला यांना कळविला आहे. सध्या ते दोघे मुंबईतील एका हॉटेलमध्ये आहेत.

आम्ही दावा करू - सदानंद गौडा
कुमारस्वामी सरकार आता पाडायचे की लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करायची, असा प्रश्न भाजपापुढे आहे. आघाडीचे बारा आमदार संपर्कात असल्याचाही भाजपाचा दावा आहे. कुमारस्वामी सरकार पडल्यास भाजपा सरकारस्थापनेचा दावा करेल, असे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा म्हणाले.

Web Title: Two independents withdrew support of Karnataka government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.