धबधब्यात बुडालेल्या दोघांचे मृतदेह तीन मित्र बाईकवरून आणत होते घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 11:56 AM2018-02-13T11:56:16+5:302018-02-13T12:00:17+5:30

दोघांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळेलला असताना त्यांच्या मित्रांनी मात्र सगळ्यांना धक्का बसेल अशी कृती केली.

Two drown in Tada, friends try to take corpses on bike | धबधब्यात बुडालेल्या दोघांचे मृतदेह तीन मित्र बाईकवरून आणत होते घरी

धबधब्यात बुडालेल्या दोघांचे मृतदेह तीन मित्र बाईकवरून आणत होते घरी

Next

चेन्नई- आंध्र प्रदेशातील टाडा धबधब्यात दोन जण बुडल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती. या दोन जणांमध्ये एका कॉलेजच्या विद्यार्थ्याचा समावेश आहे. या दोघांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळेलला असताना त्यांच्या मित्रांनी मात्र सगळ्यांना धक्का बसेल अशी कृती केली. मृत्यू झालेल्या दोघांच्या तीन मित्रांनी त्यां दोघांचे मृतदेह बाईकवरून घरी आणले.

बाईक चालविणारा व मागे बसलेल्याच्या मध्ये असलेल्या जागेत एक मृतदेह व दुसऱ्या बाईकच्या मागे एक मृतदेह अशी व्यवस्था करून त्यांनी मृतदेह घरी आणायचं ठरवलं. एका बाईकवर बाईक चालविणारा व मागे बसलेल्या मित्राच्यामध्ये मृतदेह व्यक्ती बाईकवर बसतो त्याच प्रमाणे बसवला. रस्त्यावरून येत असताना तिरूपती-चेन्नई रोडवर पोलिसांना झेंडा दाखविल्याने गाडी थांबविताना मृतदेह खाली पडला. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. 

पाच मित्र मोटारसायकल ट्रिपवर गेले होते. त्यावेळी पाच मित्रांपैकी दोन जण धबधब्यात पडले. या दोघांना बाहेर काढून इतर तिघांनी यंत्रणेला या संदर्भातील माहिती देण्याऐवजी बाईकवरून मृतदेह घरी नेण्याचं ठरविलं. मृतदेह बाईकवरून घरी आणत असताना पोलिसांना या दोन तरूणांना रस्त्यावर झेंडा दाखवून थांबायला सांगितलं त्यावेळी यशवंथ व यसिन या दोघांचे मृतदेह खाली झुकले. 
यशवंथ भगवान सिंग (वय 19), यसिन (वय 30) अशी तरूणांची नाव आहेत. आम्ही पाच जण धबधब्यामध्ये खेळत असताना यशवंथने धबधब्यातील पोहण्याच्या ठिकाणी उडी मारली. तेथे चिखल असल्याने तो त्याल अडकला. यसिन यशवंथला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना तो ही त्यात अडकला व त्याचा मृत्यू झाल्याचं, या तीन मित्रांनी पोलिसांना सांगितलं. 

दोन मित्र चिखलात अडकल्यावर इतर तिघांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मुलांच्या आवाजानंतर स्थानिकांनी तेथे येऊन मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. मुलांनी बाईकवरून मृतदेह घरी आणण्याचा निर्णय नेमका का घेतला? याबद्दलची माहिती पोलीस घेत आहेत. मोटारबाईक ट्रिपवर निघालेल्या पाच जणांनी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रोडट्रिप सुरू केली होती. त्यानंतर दुपारी ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठविले असून मृतांच्या कुटुंबीयांना याबद्दल कळविण्यात आलं आहे.
 

Web Title: Two drown in Tada, friends try to take corpses on bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.