ट्रकची राजधानी एक्स्प्रेसला धडक; दोन डबे रुळावरुन घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 10:29 AM2018-10-18T10:29:43+5:302018-10-18T10:37:55+5:30

अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसली, तरी मोटरमनला गंभीर इजा झाली आहे. 

Truck hits Delhi bound Rajdhani Express in madhya pradesh two coaches derail | ट्रकची राजधानी एक्स्प्रेसला धडक; दोन डबे रुळावरुन घसरले

ट्रकची राजधानी एक्स्प्रेसला धडक; दोन डबे रुळावरुन घसरले

Next

भोपाळ: राजधानी एक्स्प्रेसला थांडला येथे एका ट्रकनं धडक दिली. ट्रक फाटक ओलांडत असताना हा अपघात झाला. यामध्ये एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले. गोध्रा आणि रतलाम यांच्या दरम्यान असलेल्या क्रॉसिंगवर हा अपघात झाला. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसली, तरी मोटरमनला गंभीर इजा झाली आहे. 




गोध्रा आणि रतलाम यांच्या दरम्यान असलेलं फाटक वाहतुकीसाठी बंद होतं. राजधानी एक्स्प्रेस जात असल्यानं हे फाटक बंद ठेवण्यात आलं होतं. त्याचवेळी एक ट्रक थेट रुळांवर आला आणि एक्स्प्रेसला धडक दिली. या अपघातात ट्रकच्या चालकाचा मृत्यू झाला. सकाळी पावणे सातच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकच्या धडकेमुळे एक्स्प्रेसचे दोन डबे रुळांवरुन घसरले. सुदैवानं यात कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. या अपघातानंतर घसरलेल्या डब्यांमधील प्रवाशांना दुसऱ्या डब्यांमध्ये हलवण्यात आलं आणि एक्स्प्रेस दिल्लीच्या दिशेनं रवाना झाली. 



 

Web Title: Truck hits Delhi bound Rajdhani Express in madhya pradesh two coaches derail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.