लग्नात 'रसगुल्ले' न मिळाल्याने तुफान राडा, नवरीच्या आई-वडिलांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 03:24 PM2018-07-16T15:24:39+5:302018-07-16T15:28:05+5:30

लग्नात रसगुल्ले न मिळाल्यामुळे वर आणि वधु पक्षातील वऱ्हाड मंडळीत तुफान राडा झाला आहे. नवरदेवाच्या वरातीतील नाराज वऱ्हाडी मंडळींनी नवरी मुलीकडील पाहुण्यांना जबर मारहाण केली.

Troubled Rada, Navari's parents beat them due to absence of rosogon at the wedding | लग्नात 'रसगुल्ले' न मिळाल्याने तुफान राडा, नवरीच्या आई-वडिलांना मारहाण

लग्नात 'रसगुल्ले' न मिळाल्याने तुफान राडा, नवरीच्या आई-वडिलांना मारहाण

Next

पटना - लग्नात रसगुल्ले न मिळाल्यामुळे वर आणि वधु पक्षातील वऱ्हाड मंडळीत तुफान राडा झाला आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील मणिराम आखाड्याजवळ वरातीतील नाराज वऱ्हाडी मंडळींनी नवरी मुलीकडील पाहुण्यांना मारहाण केली. त्यामुळे लग्नमंडप जणू कुस्तीचा आखाडाच बनल्याचे दिसून आले. शेखपुरा जिल्ह्यातील मडपसौना या गावातून हे वऱ्हाड आले होते. 

लग्नानंतर वऱ्हाडी मंडळींना जेवण वाढण्यात येत होते. त्यावेळी वर पक्षाच्या काही तरुणांनी जेवणात रसगुल्ला देण्याची मागणी केली. अनेकवेळा रसगुल्ला देऊनही मुलाकडील मंडळी ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे वधु पक्षातील लोकांनी रसगुल्ला देण्यास नकार दिला. त्यावरुन दोन्ही पक्षात भांडण सुरु झाले. सुदैवाने तो वाद तिथेच संपुष्टात आला. मात्र, काही वेळातच वर पक्षातील जवळपास 20 ते 25 युवक काठ्या, लोखंडी रॉड, आणि लाकडी बांबू घेऊन लग्नमंडपात आले. त्यानंतर लग्नमंडपात दिसेल त्याला चोप देण्यास या तरुणांनी सुरुवात केली. त्यामुळे काही क्षणातच लग्नाच्या आनंदावर विरजण पडल्याचे पाहायाला मिळाले. या गावगुंडांनी लग्न समारंभातील महिलांनाही मारहाण केली. या घटनेत नवरी मुलीचे आई-वडिल, भाऊ, भावोजी यांसह जवळपास 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना पटना येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, आरोपी फरार झाले असून वधु पक्षाच्या मंडळींनी लग्नाचा पुढील कार्यक्रम थांबवला आहे.

Web Title: Troubled Rada, Navari's parents beat them due to absence of rosogon at the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.