तिहेरी तलाक प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय सुनावणाऱ फैसला, संपूर्ण देशाचे निकालाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 09:29 PM2017-08-21T21:29:40+5:302017-08-21T21:40:01+5:30

गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल सुनावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातून तिहेरी तलाक प्रकरणी येणाऱ्या निकालाकडे संपूर्णँ देशाचे लक्ष लागले आहे. 

In the triple divorce case tomorrow, the Supreme Court will hear the verdict, the whole country's attention | तिहेरी तलाक प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय सुनावणाऱ फैसला, संपूर्ण देशाचे निकालाकडे लक्ष

तिहेरी तलाक प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय सुनावणाऱ फैसला, संपूर्ण देशाचे निकालाकडे लक्ष

Next

नवी दिल्ली, दि. 21  -  गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल सुनावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातून तिहेरी तलाक प्रकरणी येणाऱ्या निकालाकडे संपूर्णँ देशाचे लक्ष लागले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार सर्वेच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ या प्रकरणी निर्णय सुनावणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता याबाबतचा निकाल सुनावण्यात येण्याची शक्यता आहे. तिहेरी तलाक प्रकरणी 11ते 18 मे दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायालयाने याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. 
अधिक वाचा 
महिलांना ट्रिपल तलाक नाकारण्याचा हक्क मिळू शकतो का?
ट्रिपल तलाक संपवण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढे यावं, मोदींचं आवाहन
संघर्षाने नव्हे, तर जागृतीने ट्रिपल तलाक बंद व्हावा - मोदी
तिहेरी तलाकविषयी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना केंद्र सरकारने आपण तिहेरी तलाकच्या प्रथेला वैध मानत नसल्याचे सांगितले. तसेच सरकार ही कुप्रथा सुरू ठेवण्याच्या बाजूने नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.  
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान मुस्लिमांमध्ये विवाहसंबंध संपविण्याची ‘तीन वेळा तलाक’ ही प्रथा विशिष्ट विचारसरणीच्या गटांच्या मते ‘कायदेशीर’ असली तरी प्रत्यक्षात ‘अत्यंत वाईट’ आणि ‘अनिष्ट’ आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने  व्यक्त केले होते. "तीन वेळा तलाक हा कायदेशीर आहे अशी विशिष्ट विचारसरणी आहे; परंतु ती विवाहसंबंध संपविण्याची अत्यंत वाईट आणि अनिष्ट प्रथा आहे, असे सरन्यायाधीश जे.एस. खेहार यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले होते. यावेळी पाकिस्तान, अफगाणिस्तान, मोरोक्को आणि सौदी अरेबिया या देशांत तीन वेळा तलाक म्हणून विवाहसंबंध संपविण्यास परवानगी नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले.   
11 ते 18 मे या काळात झालेल्या सुनावणीवेळी निकाहनामा म्हणजे मुस्लिमांच्या विवाहाच्यावेळी मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकला नकार देण्याचा पर्याय मिळू शकतो का ? असा सवाल पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठाने ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला विचारला होता. ट्रिपल तलाकला आव्हान देणा-या याचिकांवर न्या. जे. एस. केहर यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठापुढे सुनावणी सुरु आहे. ट्रिपल तलाकमध्ये मुस्लिमांना तीनवेळा तलाक, तलाक, तलाक बोलून वैवाहिक नाते संपवता येते. 

Web Title: In the triple divorce case tomorrow, the Supreme Court will hear the verdict, the whole country's attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.