राहुल गांधींच्या गुजरात प्रवेशापूर्वीच तीन माजी आमदार भाजपात; काँग्रेसला महाराष्ट्रानंतर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 12:43 PM2024-03-05T12:43:34+5:302024-03-05T12:43:55+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीसह होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत मोढवाढिया यांना तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा आहे.

Three former MLAs join BJP even before Rahul Gandhi's Bharat Jodo Gujarat entry; Congress gets a shock after Maharashtra | राहुल गांधींच्या गुजरात प्रवेशापूर्वीच तीन माजी आमदार भाजपात; काँग्रेसला महाराष्ट्रानंतर धक्का

राहुल गांधींच्या गुजरात प्रवेशापूर्वीच तीन माजी आमदार भाजपात; काँग्रेसला महाराष्ट्रानंतर धक्का

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसलाभाजपा एकामागोमाग एक धक्के देत आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हे धक्के बसत आहेत. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना फोडल्यानंतर आता गुजरातमध्ये धक्का देण्यात आला आहे.

भारत जोडो यात्रा गुजरामध्ये पोहचण्याच्या तीन दिवस आधीच भाजपानेकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अंबरीश डेर यांच्यासह तीन माजी आमदारांना आपल्याकडे वळविले आहे. अर्जुन मोढवाडिया, मुलू भाई कंडोरिया आणि डेर या तिघांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. दोघांनी कालच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. 

काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. यावरून हे नेते नाराज होते. मोढवाडिया यांनी राजीनामा देताना या निर्णयावर टीका केली होती. यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री नारन राठवा यांनी त्यांचा मुलाने समर्थकांसह सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

आगामी लोकसभा निवडणुकीसह होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत मोढवाढिया यांना तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा आहे. ते दोन वेळा आमदार होते. जानेवारीमध्येही काँग्रेसच्या एका ज्येष्ठ आमदाराने पक्षाचा राजीनामा दिला होता. सी. जे. चावडा यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढविली होती. 

Web Title: Three former MLAs join BJP even before Rahul Gandhi's Bharat Jodo Gujarat entry; Congress gets a shock after Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.