गुजरातमध्ये काँग्रेसला झटका! तीन आमदारांनी दिले राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 06:23 PM2017-07-27T18:23:21+5:302017-07-27T18:32:28+5:30

नोव्हेंबर महिन्यात होणा-या विधानसभा निवडणुकीआधीच गुजरात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

Three congress mla resign from congress | गुजरातमध्ये काँग्रेसला झटका! तीन आमदारांनी दिले राजीनामे

गुजरातमध्ये काँग्रेसला झटका! तीन आमदारांनी दिले राजीनामे

Next
ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीआधीच गुजरात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.शंकरसिंह वाघेला यांनी मागच्या आठवडयात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पक्षामध्ये दुफळी निर्माण झाली आहे.

सूरत, दि. 27 - नोव्हेंबर महिन्यात होणा-या विधानसभा निवडणुकीआधीच गुजरात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. शंकरसिंह वाघेला यांनी मागच्या आठवडयात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पक्षामध्ये दुफळी निर्माण झाली आहे. गुजरात विधानसभेतील काँग्रेसच्या तीन वरिष्ठ आमदारांनी गुरुवारी  राजीनामे दिले. विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य व्हीप बलवंतसिंह राजपूत यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून, पुढच्या महिन्यात होणा-या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करु शकतात. 

शंकरसिंह वाघेला यांचे निकटवर्तीय असलेल्या राजपूत यांना भाजपा पाठिंबा देण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना राज्यसभेवर जाण्यापासून रोखण्यासाठी भाजपा बलवंतसिंह राजपूत यांना पाठिंबा देऊ शकते. अहमद पटेल यांचा पराभव झाल्यास तो फक्त प्रतिष्ठेचा विषय नसेल तर, वर्षअखेरीस होणा-या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या मनोधैर्य खच्ची होईल. त्यामुळे भाजपा शंकरसिंह वाघेल यांच्या उमेदवाराला समर्थन देण्याची शक्यता आहे. 

तेजश्री पटेल आणि पीआय पटेल या दोन काँग्रेस आमदारांनी आज राजीनामे दिले. राज्यसभेसाठी जेव्हा काल अहमद पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी तेजश्री पटेल तिथे उपस्थित होत्या. गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेतील आकडेवारीमुळे भाजपा दोन जागा सहज जिंकेल. पक्षाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. मागच्या आठवडयात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत वाघेल यांच्या 11 समर्थक आमदारांनी रामनाथ कोविंद यांच्या बाजूने मतदान केले होते. 

मागच्या काही काळापासून काँग्रेसमध्ये नाराज असलेले माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला आज 77 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली. शंकर सिंह वाघेला भाजपामधून फुटून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता पार्टीची स्थापना केली होती. 17 वर्षांपूर्वी त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. शुक्रवारी आपला वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने त्यांनी गांधीनगर येथील हॉलमध्ये समर्थकांचा मेळावा आयोजित केला होता. 

Web Title: Three congress mla resign from congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.