सुषमा स्वराज यांना राज्यसभेच्या मार्गाने सरकारमध्ये आणण्यावर विचारमंथन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 05:11 AM2019-05-28T05:11:01+5:302019-05-28T05:11:12+5:30

नव्या सरकारच्या कामात अडथळा येऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या टीममधील काही अनुभवी व जुन्या चेहऱ्यांना कायम ठेवण्याच्या विचारात आहेत.

Thinking about bringing Sushma Swaraj in government through the Rajya Sabha | सुषमा स्वराज यांना राज्यसभेच्या मार्गाने सरकारमध्ये आणण्यावर विचारमंथन

सुषमा स्वराज यांना राज्यसभेच्या मार्गाने सरकारमध्ये आणण्यावर विचारमंथन

googlenewsNext

- संतोष ठाकूर 

नवी दिल्ली : नव्या सरकारच्या कामात अडथळा येऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या टीममधील काही अनुभवी व जुन्या चेहऱ्यांना कायम ठेवण्याच्या विचारात आहेत. अशा नावांमध्ये नितीन गडकरी, सुषमा स्वराज, रविशंकर प्रसाद, राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. सुषमा स्वराज यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली नसल्यामुळे त्यांना राज्यसभेच्या मार्गाने टीम मोदीमध्ये सहभागी करून घेण्यावर विचार सुरू आहे. विदेश मंत्रालयात सुषमा स्वराज यांनी मागील पाच वर्षांत ज्या पद्धतीने काम केले आहे, ते पाहता भारताची प्रतिष्ठा जगभरात वाढली आहे. विशेषकरून टिष्ट्वटरच्या माध्यमातून त्यांनी विदेशमंत्री या नात्याने ज्या पद्धतीने लोकांची मदत केली, त्याची जागतिक स्तरावर चर्चा होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांची सामाजिक स्वीकारार्हता कायम राहिली आहे, असे चेहरे केंद्रीय मंत्रिमंडळात कायम राहावेत, अशी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच इच्छा आहे. त्यात सुषमा स्वराज यांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर ज्यांनी सर्वांत आधी मोदींचे नेतृत्व मान्य करून २०१९ची विजयी मोहीम सुरू केली होती, भाजपच्या निवडक महिला नेत्यांमध्ये सुषमा स्वराज आहेत. परखड वक्ता असण्याबरोबरच भारतीय संस्कृती स्थापित करणाºया नेत्यांत त्या आघाडीवर आहेत.
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी हे स्वराज यांच्याकडे आदराने पाहतात. कदाचित स्वराज यांच्याकडेच पुन्हा एकदा विदेश मंत्रालयाचा कार्यभार सोपवला जाऊ शकतो. तथापि, काही जण या पदासाठी निर्मला सीतारामन यांचे नावही घेत आहेत.
एका नेत्याने सांगितले की, सुषमा स्वराज यांनी म्हटले होते की, त्या लोकसभा निवडणूक लढवत नाहीत. मात्र, त्या राजकारणापासून वेगळ्या होत नाहीत.
>वरील सर्व घडामोडी एका बाजूला सुरू असतानाच दुसरीकडे अमेठीतून सर्वांत मोठा विजय प्राप्त करणाºया स्मृती इराणी यांच्याबरोबरच प्रकाश जावडेकर, राज्यवर्धन राठोड, धर्मेंद्र प्रधान यांनाही मंत्रिपद देण्याची चर्चा सुरू आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे विश्वासू भूपेंद्र यादव, कैलाश विजयवर्गीय यांनाही राजकीय रूपाने पुरस्कृत करण्याची चर्चा आहे. संघटनेतील काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात आणण्याबरोबरच सरकारमधील काही जणांना संघटनेत पाठवण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Thinking about bringing Sushma Swaraj in government through the Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.