आजोळी जाऊनही राहुलमध्ये सुधारणा नाही- अनिल विज

By admin | Published: July 14, 2017 01:39 PM2017-07-14T13:39:40+5:302017-07-14T13:39:40+5:30

हरियाणाचे क्रीडा मंत्री अनिल विज यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

There is no improvement in Rahul even after unmarried- Anil Vij | आजोळी जाऊनही राहुलमध्ये सुधारणा नाही- अनिल विज

आजोळी जाऊनही राहुलमध्ये सुधारणा नाही- अनिल विज

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 14- हरियाणाचे क्रीडा मंत्री अनिल विज यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘राहुल गांधी आजीच्या घरी जाऊन सुधारतील अशी अपेक्षा होती. पण तिथून परतल्यावरही त्यांना अक्कल आलेली नाही’ असं वक्तव्य अनिल विज यांनी केलं आहे. शुक्रवारी अनिल विज यांनी ही टीका केली आहे. राहुल गांधी काही दिवसांपूर्वी इटलीला त्यांच्या आजीच्या घरी गेले होते. त्याचा दाखला देत अनिल विज यांनी ही टीका केली आहे.
 
‘राहुल गांधी इटलीमध्ये आजीच्या घरी जाऊन सुधारतील अशी अपेक्षा आमच्यासह सगळ्यांनाच होती. पण तसं काहीही झालं नाही. राहुल गांधी आजीच्या घरूनही रिकाम्या हाताने परत आहे. त्यांना अजून अक्कल आलेली नाही, राहुल गांधी यांनी आता राजकारणातून सन्यास घ्यायला हवा, असंही ते म्हणले आहेत. अनिल विज यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने मात्र अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 
 
याआधीसुद्धा भाजपचे नेते अनिल विज यांनी केलेल्या टीकेमुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. काही दिवसांपूर्वी अनिल विज यांनी दहशतवादाविषयीही वक्तव्य केलं होतं. हिंदू हा दहशतवादी होऊच शकत नाही. विरोधी पक्ष हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग फक्त राजकीय फायद्यासाठीच करतात. या जगातून हिंदूच दहशतवाद नष्ट करु शकतात’ असा दावा विज यांनी केला होता. तसंच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भारतात जन्म घेतल्याची लाज वाट असेल तर ममता बॅनर्जींनी समुद्रात उडी मारावी असं विज म्हणाले होते. 
आणखी वाचा
 

मुंबईत दिवसाढवळया त्याने तरुणीसमोर सोडली लाज

कुलभूषण जाधव यांच्या आईला पाक देणार व्हिसा?

आळशी देशांच्या यादीत भारताचा नंबर

13 जून रोजी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा परदेश दौ-यावर गेले होते. यावेळी सुट्ट्यांच्या निमित्ताने राहुल गांधी आपल्या आजीच्या घरी गेले होते. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून आपण फिरायला चाललो असल्याची माहिती दिली. "माझी आजी आणि कुटुंबाला भेटण्यासाठी काही दिवसांसाठी जात आहे. त्यांच्यासोबत काही वेळ घालवणार आहे", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. 

 

Web Title: There is no improvement in Rahul even after unmarried- Anil Vij

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.