मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अख्खं राज्य सरकारच केंद्राविरोधात मैदानात उतरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 02:20 PM2024-02-07T14:20:50+5:302024-02-07T14:22:42+5:30

आम्ही सर्वाधिक महसूल केंद्र सरकारला देतो. त्यामुळे आमच्या हक्काचे आम्हाला द्यावे असं उपमुख्यमंत्री डि.के शिवकुमार यांनी म्हटलं. 

The entire karnatak state government, including the Chief Minister, Deputy Chief Minister agitation against the Centre government | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अख्खं राज्य सरकारच केंद्राविरोधात मैदानात उतरलं

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अख्खं राज्य सरकारच केंद्राविरोधात मैदानात उतरलं

नवी दिल्ली - Karnatak Government Protest in Delhi ( Marathi News ) राजधानी दिल्लीत जंतर मंतरवर अनेक आंदोलने पाहिली असतील परंतु अख्खं राज्य सरकारच केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्याचे पहिल्यांदा घडले आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर कर्नाटक सरकारने केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली आहेत. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याासह मंत्री, आमदारही उपस्थित आहेत. केंद्र सरकारकडून आम्हाला कर परतावा दिला जात नाही त्याचसोबत कुठलीही आर्थिक मदत केली जात नाही असा आरोप कर्नाटक सरकारने केला आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया म्हणाले की, आम्ही १०० रुपये केंद्र सरकारला पाठवतो परंतु त्यातील १२-१२ रुपयेच परत मिळतात. आम्हाला आमचा हक्क हवा. जे धोरण गुजरातसाठी बनवले जाते तेच आम्हालाही लागू करावे. कर्नाटकशिवाय केरळ, तामिळनाडू, तेलंगणानेही केंद्र सरकारच्या निधीवाटपावर भेदभावाचा आरोप केला आहे. कर संकलनात महाराष्ट्र हा एक नंबरला आहे तर कर्नाटकचा दुसरा नंबर लागतो. कर्नाटकचे कर संकलनात ४.३० लाख कोटी योगदान आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. 

तर कन्नड लोकांच्या हितासाठी आम्ही दिल्लीत निर्दशने करत आहोत. आम्हाला आमच्या हक्काचा कर परतावा दिला जावा. त्याचसह दुष्काळात केंद्र सरकारने कुठलीही मदत कर्नाटकला दिली नाही. आम्हाला आमचा अधिकार हवा. आम्हाला केवळ १३ टक्के मिळतात. इतर राज्यांना किती मदत मिळते यावर बोलणार नाही. मात्र जे गुजरातला दिले जाते ते केंद्र सरकारने आम्हालाही द्यावे. कर्नाटक देशातील सर्वात मोठे दुसरे राज्य आहे. आम्ही सर्वाधिक महसूल केंद्र सरकारला देतो. त्यामुळे आमच्या हक्काचे आम्हाला द्यावे असं उपमुख्यमंत्री डि.के शिवकुमार यांनी म्हटलं. 

दरम्यान, आंदोलनाआधी मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियात पोस्ट केले. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात आम्ही दिल्लीत जातोय. कर्नाटकला मिळणारा कर परतावा आणि निधी वाटपात होणारा भेदभाव याविरोधात आम्ही आवाज उठवत आहोत. आमची ही चळवळ भाजपाविरोधात नाही. तर कर्नाटकच्या लोकांसाठी ही चळवळ हाती घेतली आहे. त्यामुळे मी सर्व पक्षातील लोकांना तुम्ही या चळवळीत सहभाग नोंदवावा असं आवाहन मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी केले होते. 
 

Web Title: The entire karnatak state government, including the Chief Minister, Deputy Chief Minister agitation against the Centre government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.