थरुर यांच्या कार्यालयास ‘भाजयुमो’ने काळे फासले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 03:27 AM2018-07-17T03:27:03+5:302018-07-17T03:27:23+5:30

लोकसभा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ होईल, असे विधान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या येथील मतदारसंघ कार्यालयात हैदोस घालून अनेक वस्तूंना काळे फासले.

Tharoor's office was cut off by 'BJYMO' | थरुर यांच्या कार्यालयास ‘भाजयुमो’ने काळे फासले

थरुर यांच्या कार्यालयास ‘भाजयुमो’ने काळे फासले

Next

तिरुवनंतपूरम : लोकसभा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ होईल, असे विधान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या येथील मतदारसंघ कार्यालयात हैदोस घालून अनेक वस्तूंना काळे फासले.
हा प्रकार झाला तेव्हा स्वत: थरुर कार्यालयात नव्हते. मात्र नंतर त्यांनी टष्ट्वीट करून असा दावा केला की, कार्यालयाचे प्रवेशव्दार, भिंती, दरवाजे आणि तेथे लावलेल्या फलकांवर काळे इंजिन आॅईल फासले. ‘हिंदू पाकिस्तान’चे कार्यलय असा फलक लावून त्यांना मी पाकिस्तानात निघून जावे, अशा घोषणाही दिल्या.
मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांचे उत्तर गुंडगिरी असे असेल तर हिंदूही त्यांच्यापासून दूर जातील, असेही थरुर यांनी टष्ट्वीटमध्ये म्हटले.
भाजपाने या कृत्याचा इन्कार न करता उलट समर्थण केले. तिरुवनंतपुरम जिल्हा भाजपा अध्यक्ष एस. सुरेश म्हमाले की, थरुर या शहरातून निवडून गेलेले खासदार आहेत. त्यांनी केलेल्या चुकीच्या विधानाचा नागरिकांनी निषेध नोंदविला यात गैर काहीच नाही.

Web Title: Tharoor's office was cut off by 'BJYMO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.