वर्दीतील माणुसकी! परीक्षा देणाऱ्या आईसाठी पोलिसाने केला बाळाचा सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 10:56 AM2018-10-01T10:56:14+5:302018-10-01T11:21:03+5:30

सोशल मीडियावर पोलिसाचा एक फोटो व्हायरल होत असून या फोटोने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. 

Telangana cop babysits while mother writes exam, wins hearts | वर्दीतील माणुसकी! परीक्षा देणाऱ्या आईसाठी पोलिसाने केला बाळाचा सांभाळ

वर्दीतील माणुसकी! परीक्षा देणाऱ्या आईसाठी पोलिसाने केला बाळाचा सांभाळ

Next

महबूबनगर - उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने अॅपलच्या मॅनेजरवर गोळ्या घातल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर अनेकांनी पोलिसांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता सोशल मीडियावर पोलिसाचा एक फोटो व्हायरल होत असून या फोटोने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. 



तेलंगणाच्या पोलीस दलात कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल मुजीब-उर-रहमान यांचा हा फोटो आहे. या फोटोत ते लहान बाळासोबत खेळताना दिसत आहेत. मुजीब-उर-रहमान यांची रविवारी (30 सप्टेंबर) महबूबनगरमधील एका परीक्षा केंद्रात ड्यूटी लागली होती. त्याचदरम्यान एक महिला तिच्या लहान बाळाला घेऊन परीक्षेसाठी आली होती. त्यावेळी तिचा पेपर संपेपर्यंत रहमान यांनी महिलेच्या बाळाचा योग्य सांभाळ केला. 

मुलाला खेळवतानाचा रहमान यांचा एक फोटो महबूबनगरच्या एसपी रमा राजेश्वरी यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून रहमान यांची खूप प्रशंसा केली जात आहे. रमा राजेश्वरी यांचं हे ट्वीट आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केलं असून तब्बल 2800 हून अधिक लोकांनी ते रिट्वीट केलं आहे. 

Web Title: Telangana cop babysits while mother writes exam, wins hearts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.