...तर काश्मिरात तिरंगा फडकणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:17 AM2017-07-30T03:17:18+5:302017-07-30T06:04:13+5:30

काश्मिरी जनतेला विशेषाधिकार देणाºया घटनेतील कलम ३५ (अ) मध्ये हस्तक्षेप केल्यास गंभीर परिणाम होतील, तिरंग्याचे रक्षण करण्यासाठी काश्मिरात

tara-kaasamairaata-tairangaa-phadakanaara-naahai | ...तर काश्मिरात तिरंगा फडकणार नाही!

...तर काश्मिरात तिरंगा फडकणार नाही!

Next

नवी दिल्ली : काश्मिरी जनतेला विशेषाधिकार देणाºया घटनेतील कलम ३५ (अ) मध्ये हस्तक्षेप केल्यास गंभीर परिणाम होतील, तिरंग्याचे रक्षण करण्यासाठी काश्मिरात कोणीही नसेल, असा इशारा मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिला आहे.
घटनेच्या ३५ (अ) कलमान्वये जम्मू-काश्मीरचे ‘कायम निवासी’ कोण, हे ठरविण्याचा हक्क राज्याच्या विधानसभेला आहे, तसेच या कायम निवासी नागरिकांना विशेष हक्क आहेत. मेहबुबा यांनी घटनेतील या कलमाचे समर्थन केले. त्या म्हणाल्या की, यात बदल केल्यास जम्मू-काश्मिरात तिरंगा फडकणार नाही. नॅशनल कॉन्फरन्स व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या कार्यकर्त्यांचे जीवित धोक्यात येईल. हे कार्यकर्तेच ठामपणे काश्मिरात राष्टÑध्वज फडकावतात. (वृत्तसंस्था)

- या कलमातील हस्तक्षेप अजिबात स्वीकारला जाणार नाही, अशा खेळ्या करून तुम्ही भारताचा स्वीकार करणाºया शक्तींनाच कमजोर करीत आहात. ‘वुई द सिटिझन्स’ नावाच्या एका स्वयंसेवी संघटनेने घटनेतील ३५ (अ) कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे कलम संसदेसमोर मांडण्यातच आलेले नाही. राष्टÑपतींच्या आदेशाने त्याची अंमलबजावणी करण्यात आली, त्यामुळे ते रद्द करण्यात यावे, अशी विनंती याचिकेत आहे.

‘पीओके’मध्ये विधानसभा अधिवेशन
मेहबूबा म्हणाल्या की, आमच्या विधानसभेत तिकडच्या काश्मीरसाठी (पाकव्याप्त) काही जागा राखीव आहेत. या जागांवर नेमणुका व्हायला हव्यात. आपल्या विधानसभेचे वर्षातील एक अधिवेशन या काश्मिरात (भारतातील काश्मिरात) आणि एकदा त्या काश्मिरात (पाकिस्तानातील) व्हायला हवे. त्यामुळे आपण पर्यटन, प्रवास खुले करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा करू शकू.

नियंत्रण रेषेवरून व्यापार हवा
श्रीनगर : विशाल रॅलीला संबोधित करताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, नियंत्रण रेषेवरील व्यापारी मार्ग बंद करण्याची परवानगी पीडीपी कधीच देणार नाही. याउलट पाकव्याप्त काश्मीरशी अधिकाधिक व्यापार वाढावा, यासाठी आणखी मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. वाघा सीमेवरून चरस आणि गांजाची तस्करी होत असते, तरीही हा मार्ग बंद केला गेला नाही, याचा त्यांनी या संदर्भात उल्लेख केला.

Web Title: tara-kaasamairaata-tairangaa-phadakanaara-naahai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.