भ्रष्टाचारावर माझ्यासोबत 15 मिनिटे बोला, 'दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल;  राहुल गांधींचे मोदींना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 07:48 PM2019-04-22T19:48:02+5:302019-04-22T19:48:06+5:30

सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन मोदींना चौकीदार चोर है म्हटल्याप्रकरणी माफी मागून काही वेळ उलटत नाही तोच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

Talk to me about corruption for only 15 minutes; Rahul Gandhi's challenge to Modi | भ्रष्टाचारावर माझ्यासोबत 15 मिनिटे बोला, 'दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल;  राहुल गांधींचे मोदींना आव्हान

भ्रष्टाचारावर माझ्यासोबत 15 मिनिटे बोला, 'दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल;  राहुल गांधींचे मोदींना आव्हान

Next

रायबरेली - सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन मोदींना चौकीदार चोर है म्हटल्याप्रकरणी माफी मागून काही वेळ उलटत नाही तोच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर माझ्यासोबत केवळ 15 मिनिटे बोलावे, म्हणजे दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल, असे आव्हान राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिले. 

रायबरेली येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की,''नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर माझ्यासोबत 15 मिनिटे चर्चा करावी, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल. मात्र या चर्चेनंतर नरेंद्र मोदी हे देशाला आपला चेहरा दाखवू शकणार नाहीत.''

 दरम्यान, राहुल गांधी यांनी अमेठी येथे पुन्हा एकदा चौकीदार चोर है च्या घोषणा दिल्या. गेल्या पाच वर्षांत चौकीदाराने तुमच्याकडील बऱ्याच गोष्टी चोरल्या. त्यांनी फूड पार्क, रुग्णालय, शाळा सर्व तुमच्याकडून काढून घेतले. आता माझे सरकार आल्यावर मी तुम्हाला सर्व दुप्पटीने परत करीन.''  

Web Title: Talk to me about corruption for only 15 minutes; Rahul Gandhi's challenge to Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.