दहशतवाद्यांना रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 05:23 AM2018-06-18T05:23:19+5:302018-06-18T05:23:19+5:30

केंद्र सरकारने ही शस्त्रसंधी यापुढे सुरु न ठेवण्याचा निर्णय घेत सुरक्षा दलांना दहशतवाद्यांविरुद्ध आक्रमक कारवाई पुन्हा सुरु करण्याचे निर्देश दिले.

Take all the steps necessary to stop the terrorists! | दहशतवाद्यांना रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचला!

दहशतवाद्यांना रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचला!

Next

नवी दिल्ली: अशांत काश्मीरमध्ये विश्वास व शांततेचे वातावरण तयार व्हावे यासाठी रमझान महिन्यात सुरक्षा दलांनी शस्त्रे म्यान करूनही दहशतवादी कारवाया व हिंसाचार कमी झाला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ही शस्त्रसंधी यापुढे सुरु न ठेवण्याचा निर्णय घेत सुरक्षा दलांना दहशतवाद्यांविरुद्ध आक्रमक कारवाई पुन्हा सुरु करण्याचे निर्देश दिले.
मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काश्मिरमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय गृह मंत्रालयाने टष्ट्वीटरवर जाहीर केला. गृहमंत्री राजनाथ सिंग व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्यासह वरिष्ठ सनदी व लष्करी अधिकारी बैठकीस हजर होते. राजनाथ सिंग यांनी म्हटले की, दहशतवाद्यांना एकाकी पाडण्यासाठी सर्व शांतताप्रिय लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
>राज्यातील पक्ष नाराज
शस्त्रसंधी न वाढविल्याने जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली. शस्त्रसंधी यशस्वी व्हावी, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करायला हवे, असे मत नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केले. सत्ताधारी पीडीपीने म्हटले की, सरकारच्या निर्णयावर आम्ही नाराज आहोत. मात्र, आम्ही काहीच करू शकत नाही. कारण शांतता राखण्याची जबाबदारी दोन्ही बाजूची आहे. रमझानमधील शस्त्रसंधीचे चांगले फलित
दिसले, तर ती अमरनाथ यात्रेच्या काळातही पुढे सुरू ठेवण्याचा सरकार विचार करणार होते. मात्र, तसे केले, तर अमरनाथ यात्रेची सुरक्षितता अधिक धोेक्यात येईल, असा निष्कर्ष सरकारने काढला. शस्त्रसंधी लागू करण्यापूर्वीच्या महिनाभरात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद व हिंसाचाराच्या १७ घटना घडल्या होत्या, तर शस्त्रसंधीच्या काळात त्या वाढून ५०वर पोहोचल्या, याची बैठकीत नोंद घेण्यात आली. याच काळात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवायांमध्ये ३५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.गृहमंत्रालयाने टिष्ट्वटमध्ये म्हटले की, शनिवारी मध्यरात्री रमझान महिना संपताच, सुरक्षा दलांनी पाळलेली ‘शस्त्रसंधी’ही संपुष्टात आली असून, त्यांना पुन्हा कारवाई सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.
स्फोटात पाच जखमी
काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील एका बागेत स्फोट झाला. त्यात पाच जखमी झाले आहेत. स्फोट कोणी घडवला, याचा शोध सुरू आहे.
>...म्हणून केली होती कारवाई स्थगित
स्वत: गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या नव्या निर्णयाची कारणमीमांसा करताना टिष्ट्वटरवर लिहिले की, काश्मीरमध्ये विश्वास आणि शांततेचे वातावरण निर्माण होण्यास हातभार लागावा, या उद्देशाने सरकारने रमझानमध्ये सुरक्षा दलांची कारवाई स्थगित केली होती. याचे देशात सर्वत्र स्वागत केले गेले व यामुळे काश्मीरच्या जनतेला मोठा दिलासाही मिळाला होता. त्यामुळे सरकारच्या या पुढाकारास सर्वांकडून सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा होती. या काळात सुरक्षा दलांनी वाखाणण्याजोगा संयम बाळगला, परंतु दहशतवाद्यांनी नागरिक व सुरक्षा दलांवरील हल्ले सुरूच ठेवल्याने अनेकांचे मृत्यू झाले व अनेक जखमी झाले.
>जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त वातावरण तयार व्हावे, यासाठी सरकारचे प्रयत्न यापुढेही सुरूच राहतील. दहशतवाद्यांना हल्ला करण्यापासून व हिंसाचार व हत्या करण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश सुरक्षा
दलांना देण्यात येत आहेत.
- राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री
रमझानमधील रक्तपात
१४ जून: ज्येष्ठ संपादक शुजात
बुखारी यांची दोन अंगरक्षकांसह हत्या.
१२ जून: पुलवामा जिल्ह्यातील
दोन हल्ल्यांत दोन पोलीस शहीद व सीआरपीएपचे १२ जवान जखमी.
११ जून: पोलीस आउटपोस्टवर
हल्ला करून शस्त्रे पळविणाºया
दोन दहशतवाद्यांना अटक.
१० जून : कुपावाडा जिल्ह्यात घुसखोरी करमारे सहा अतिरेक्यांचा खात्मा.
७ जून: सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात लष्कराचा जवान शहीद.
६ जून: मच्छिल सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.
तीन घुसखोरांना कंठस्नान.
५ जून: बंदिपोरा येथील लष्करी छावणीवरील हल्ला निष्फळ.
४ जून: शोपियानमध्ये अतिरेक्यांनी फेकलेल्या हातबॉम्बनी चार पोलीस
व १२ नागरिक जखमी.

Web Title: Take all the steps necessary to stop the terrorists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.