Video: अवघ्या 30 सेकंदात अचूक लक्ष्य भेदणार, स्वदेशी बनावटीची 'धनुष' तोफ दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 01:14 PM2019-04-08T13:14:24+5:302019-04-08T13:16:09+5:30

जम्मू-काश्मीर आणि राजस्थानच्या रेतीमधूनही शत्रूंवर थेट लक्ष्य साधणारी स्वदेशी बनावटीची 'धनुष' तोफ भारतीय लष्करात दाखल झाली आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य धनुष  तोफेच्या समावेशामुळे वाढणार आहे.

Swadeshi Dhanush Artillery Gun To Be Inducted In Indian Army Today | Video: अवघ्या 30 सेकंदात अचूक लक्ष्य भेदणार, स्वदेशी बनावटीची 'धनुष' तोफ दाखल

Video: अवघ्या 30 सेकंदात अचूक लक्ष्य भेदणार, स्वदेशी बनावटीची 'धनुष' तोफ दाखल

Next

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर आणि राजस्थानच्या रेतीमधूनही शत्रूंवर थेट लक्ष्य साधणारी स्वदेशी बनावटीची 'धनुष' तोफ भारतीय लष्करात दाखल झाली आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य धनुष  तोफेच्या समावेशामुळे वाढणार आहे. जम्मू-काश्मीर आणि राजस्थानच्या भारतीय सीमेवर तैनात करण्यात येतील.

धनुष तोफेसाठी वापरण्यात आलेलं साहित्यातील जवळपास 90 टक्क्याहून अधिक वस्तू स्वदेशी बनावटीच्या आहेत. लष्कराकडून प्रत्येक हवामानानुसार या तोफेचे परिक्षण करण्यात आले आहे. याबाबत भारतीय लष्कर आणि सुरक्षा मंत्रालय यांनी 19 फेब्रुवारीला हिरवा कंदील दाखवला होता. 2022-23 पर्यंत भारतीय लष्कराच्या ताफ्यात 114 धनुष तोफांचा समावेश करण्यात येणार आहे. आज होणाऱ्या कार्यक्रमात लष्कराकडे सर्वप्रथम 6 तोफा सुपूर्द करण्यात येतील . भारतीय लष्कराची पहिली स्वदेशी बोफोर्स म्हणून धनुष तोफ ओळखली जाणार आहे.


155 बाय 45 कॅलिबरची गन धनुष या तोफेमध्ये बसवण्यात आली आहे. डोंगराळ आणि रेती असणाऱ्या भागात या तोफेचा सहजरित्या वापर केला जाऊ शकतो. जवळपास 30-35 किलोमिटर पेक्षा अधिक अंतरापर्यंत ही तोफ मारा करू शकते. तर, के-9 या बंदूकीमध्ये 38 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता आहे. धनुष या तोफेचे 90 टक्के भाग भारतात बनलेले आहेत. 

तोफेचा मारा सक्षमतेने अचूक व्हावा यासाठी तोफ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अद्ययावत करण्यात आली आहे. या तोफेमधून विविध प्रकारचा दारुगोळा डागता येणार आहे. फिल्ड गन आणि डीआरडीओने दिलेल्या कालावधीच्या आधीच धनुष तोफ तयार करुन लष्कराच्या स्वाधीन केली आहे. या तोफेची किंमत 14.5 कोटी रुपये आहे. धनुष स्वदेशी तोफ अत्याधुनिक पद्धतीने बनविण्यात आली आहे. यामध्ये कॉम्प्युटर लावण्यात आलेला आहे. त्यामुळे ही तोफ स्वत:चं दारूगोळा तोफेत घेऊन फायर करुन शकणार आहे. दिवसाच्या उजेडासोबत रात्रीच्या अंधारातही अचूक मारा करण्यासाठी ही तोफ सज्ज आहे. धनुष तोफ चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहे. धनुषच्या समावेशाने भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात दुपटीने वाढ झाली आहे. 

धनुष तोफेचे वैशिष्टे
या तोफेतील बॅरेलचे वजन 2 हजार 692 इतकं आहे. 
35 ते 40 किलोमीटरपेक्षा अधिक क्षमतेने मारा करु शकतो. 
एका मिनिटात 2 वेळा मारा करु शकतं. 
सलग 2 तास मारा करण्याची क्षमता 
तोफेत लागणाऱ्या गोळ्याचे वजन 46.5 किलो. 
 

Web Title: Swadeshi Dhanush Artillery Gun To Be Inducted In Indian Army Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.