अयोध्येतील राम मंदिरात 1.5 क्विंटलचे सुवर्ण रामचरितमानस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 01:11 PM2024-04-12T13:11:45+5:302024-04-12T13:13:10+5:30

प्रत्येक पानाला सोन्याचा मुलामा

Suvarna Ram Charitmanas in Ram Temple in Ayodhya | अयोध्येतील राम मंदिरात 1.5 क्विंटलचे सुवर्ण रामचरितमानस

अयोध्येतील राम मंदिरात 1.5 क्विंटलचे सुवर्ण रामचरितमानस

लोकमत न्यूज नेटवर्क
अयोध्या : अयोध्येत राम मंदिरात श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात दानधर्म करण्यात येत आहेत. मध्य प्रदेशचे माजी आयएएस अधिकारी सुब्रह्मण्यम लक्ष्मी नारायण यांनी राम मंदिर ट्रस्टला सोन्याचे रामचरितमानस भेट दिले आहे. राम मंदिरात मंगळवारी चैत्र नवरात्रीला या रामचरितमानसची स्थापना करण्यात आली. 

अल्ट्राव्हायोलेट प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून सोन्याच्या पानांवर रामचरितमानसमधील मजकूर डिझाइन केला आहे. त्याची निर्मिती चेन्नईच्या प्रसिद्ध बुममंडी बंगारू ज्वेलर्सकडून करण्यात आली आहे. सुवर्णजडीत रामचरितमानस ग्रंथाची निर्मिती करण्यास सुमारे आठ महिन्यांचा कालावधी लागला.  

रामदर्शनासोबत सुवर्णग्रंथाचेही दर्शन
nराम मंदिरातील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीपासून १५ फूट अंतरावर रामचरितमानस ग्रंथाची स्थापना करण्यात आली आहे. 
nमंदिरात भाविकांना श्रीरामांसह या सुवर्णग्रंथाचेही दर्शन घेता येणार असल्याचे मंदिरातील पुजारी संतोष कुमार तिवारी यांनी सांगितले. 
nराम मंदिरात रामचरितमानस ग्रंथ ठेवण्यासाठी खास स्टॅंडही तयार केले आहे.

कसे आहे सुवर्ण रामचरितमानस? 

 

Web Title: Suvarna Ram Charitmanas in Ram Temple in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.