मोदी सरकार-2 मध्ये सुषमा स्वराज यांचा समावेश नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 08:22 PM2019-05-30T20:22:56+5:302019-05-30T20:28:18+5:30

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि मोदी सरकार -1 मधील कर्तव्यदक्ष मंत्री सुषमा स्वराज यांचा मोदी सरकार-2 मध्ये समावेश नसणार आहे. 

sushma swaraj will not be cabinet minister will not hold external affairs ministry 1 | मोदी सरकार-2 मध्ये सुषमा स्वराज यांचा समावेश नाही 

मोदी सरकार-2 मध्ये सुषमा स्वराज यांचा समावेश नाही 

Next

नवी दिल्ली : आजपासून 'नमोपर्व 2.0' ची सुरुवात झाली. देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी आज शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि मोदी सरकार -1 मधील कर्तव्यदक्ष मंत्री सुषमा स्वराज यांचा मोदी सरकार-2 मध्ये समावेश नसणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकार-2 मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली राहणार नसल्याचे जाहीर आहे. यानंतर सुषमा स्वराज यांनीही प्रकृतीचे कारण नरेंद्र मोदींच्या नव्या सरकार-2 मध्ये राहणार नसल्याचे सांगितले आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान, आजच्या शपथविधी सोहळ्यात सुषमा स्वराज उपस्थित राहिल्या आहेत. मात्र, त्या मोदी सरकार-2 मध्ये मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या मंत्र्याच्या रांगेत बसल्या नाहीत, तर उपस्थितांमध्ये बसल्या आहेत. त्यामुळे त्यांना या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नरेंद्र मोदी सरकार हे गरजूंच्या मदतीला धावून जाणारे, झटपट कामे करणारे आणि पाकिस्तानला रोखठोक प्रत्युत्तर देणारे आहे, ही प्रतिमा निर्माण करण्यात सुषमा स्वराज यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मोदी सरकार -1 मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम करताना त्यांनी अनेक देशांशी मैत्रीचे संबंध जोडले. त्याचवेळी, दहशतवादाच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला उघडे पाडले, त्यांना खडे बोल सुनावले आणि देशवासीयांची मनं जिंकली आहेत.  


दरम्यान, 'मोदी सरकार 2' च्या शपथविधी सोहळ्यासाठी संध्याकाळी ५.३० वाजल्यापासूनच राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मान्यवर जमू लागले होते. ६.५७ वाजता नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात दाखल झाले. पुढच्या पाचच मिनिटांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आगमन झाले आणि राष्ट्रगीताची धून वाजली. त्यानंतर ७.०४ च्या ठोक्याला नरेंद्र दामोदरदास मोदींचं नाव पुकारण्यात आले आणि काही सेकंदातच ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं...’ अशी शपथ ऐकताना सगळेच भारावले.

Web Title: sushma swaraj will not be cabinet minister will not hold external affairs ministry 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.