आश्चर्य! तरुणीला रक्त देण्यासाठी 'त्या' जवानांनी तोडला रोझा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 08:41 PM2018-06-14T20:41:56+5:302018-06-14T20:41:56+5:30

काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांनी मानवतेचं अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे. रमझानच्या पवित्र्य महिन्यात अनेक मुस्लिम तरुण रोजे ठेवतात.

Surprise! To give the blood to the woman, the 'soldiers' broke | आश्चर्य! तरुणीला रक्त देण्यासाठी 'त्या' जवानांनी तोडला रोझा

आश्चर्य! तरुणीला रक्त देण्यासाठी 'त्या' जवानांनी तोडला रोझा

Next

श्रीनगर- काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांनी मानवतेचं अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे. रमझानच्या पवित्र्य महिन्यात अनेक मुस्लिम तरुण रोजे ठेवतात. त्यात दोन सीआरपीएफ जवानांनी रोजे तोडून चक्क एका मुलीला रक्तदान केलं आहे. बुधवारी ल्युकिमियाग्रस्त 20 वर्षांच्या मुलीला रक्ताची गरज होती.

तरुणीचा जीव वाचवण्यासाठी जवानांनी रोजे तोडले आणि रक्तदान करून मानवतेचं मूर्तिमंत उदाहरण प्रस्तूत केलं. बुधवारी सीआरपीएफ जवान संजय पासवान, मुदासीर रसूल, मोहम्मद अस्लम मीर आणि राम निवास जेव्हा स्वतःच्या कामावरून परतले, तेव्हा त्यांनी कॅम्पमध्ये न जाता थेट शेर-एक काश्मीर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान केले.

यातील दोन जवान मुदासीर रसूल आणि मोहम्मद अस्लम मीर यांनी रोजा ठेवला होता. रोझामध्ये काहीही न खाता राहावं लागतं. तसेच काहीही न खाता रक्तदानसुद्धा करता येत नाही. त्यासाठी दोघांना रोजे तोडावे लागले आणि त्यानंतर त्यांनी रक्तदान केलं. चारही जवानांनी त्या मुलीसाठी रक्तदान केलं. मदतीसाठी पुढे सरसावलेला सीआरपीएफ जवान काश्मीरमध्ये हेल्पलाइन चालवतो. हेल्पलाइनच्या माध्यमातून काश्मीरमधल्या गरजवंतांना मदत करतो. 
काय आहे ल्युकिमिया ?
या आजारीच लक्षणं जास्त करून महिलांमध्ये आढळून येतात. या आजारामुळे शरीरात कर्करोगाची लक्षणं वाढीस लागतात. ल्युकिमियाग्रस्त रुग्णाला वारंवार रक्ताची गरज भासते. 
 

Web Title: Surprise! To give the blood to the woman, the 'soldiers' broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.