सरकारी आरोग्य केंद्रात टॉर्चच्या प्रकाशात 32 रुग्णांवर शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 09:48 PM2017-12-26T21:48:20+5:302017-12-26T21:48:27+5:30

सरकारी आरोग्य केंद्रात टॉर्चच्या प्रकाशात 32 रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Surgery on 32 patients with Torch light in government health center | सरकारी आरोग्य केंद्रात टॉर्चच्या प्रकाशात 32 रुग्णांवर शस्त्रक्रिया

सरकारी आरोग्य केंद्रात टॉर्चच्या प्रकाशात 32 रुग्णांवर शस्त्रक्रिया

Next

लखनऊ : सरकारी आरोग्य केंद्रात टॉर्चच्या प्रकाशात 32 रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांला सध्या कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. 

उत्तर प्रदेशातील उन्नावमधल्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा पराक्रम केला आहे.   लखनऊपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या उन्नावमधील एका सरकारी आरोग्य केंद्रात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. टॉर्चच्या प्रकाशात 32 जणांवर मोतिबिंदूचं ऑपरेशन करण्यात आलं. हा प्रकार मोबाईल कॅमेरावर शूट करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
शस्त्रक्रिया झालेले रुग्ण हे उन्नाव आणि शेजारच्या कानपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील गरीब रुग्ण आहेत. कानपूरमधील जगदंबा सेवा समिती या एनजीओने या रुग्णांना सरकारी आरोग्य केंद्रात आणलं होतं. सर्व रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. 

एनजीओने या सर्व शस्त्रक्रियांसाठी कानपूरमधील डॉक्टरला पाचारण केलं होतं. वीज गेल्यास जनरेटरची व्यवस्थाही संबंधित डॉक्टरकडून करण्यात येणार होती, असा दावा करण्यात आला आहे. त्यातच, संबंधित आरोग्य केंद्रातील सरकारी डॉक्टर या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार होता, मात्र त्यानेही दांडी मारली.

दरम्यान, दिवसा ऑपरेशन करण्याची सक्ती असताना रात्रीची वेळ का निवडण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचप्रमाणे वीज गेल्यावर जनरेटर का सुरु करण्यात आलं नाही, तेही समजू शकलेलं नाही. त्याचप्रमाणे 24 तास रुग्णांवर देखरेख करणं आवश्यक असताना, त्यांना सकाळीच डिस्चार्ज दिल्यानेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

Web Title: Surgery on 32 patients with Torch light in government health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.